August 8, 2026 9:22 PM

views 35

आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन आपल्या ज्ञानाचा फायदा देशाला मिळावा याचा प्रयत्न करावा-प्रधानमंत्री

आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन आपल्या ज्ञानाचा फायदा देशाला मिळावा याचा प्रयत्न करावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आयआयटी दिल्लीच्या ५७व्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यार्थ्यांची स्वप्न आणि आत्मनिर्भरतेची आस विकसित भारताची...

August 8, 2026 9:22 PM

views 40

शहरी सहकारी बँकांसाठी सायबर आणि डिजिटल सुरक्षा प्रणाली आणखी बळकट करण्याची गरज-गृहमंत्री

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर आहेत.  राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या नवीन कार्यालयाचं उद्घघाटन त्यांच्या हस्ते झालं. राज्यातल्या नागरी  सहकारी बँक महासंघ तसंच जिल्हा बँक संघटनांच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय नागरी ...

August 8, 2026 9:32 PM

views 27

मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात देणगी अपहाराच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात देणग्यांचा अपहार होत असल्याच्या आरोपांची समग्र चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मंदिराच्या गेल्या ५ वर्षातल्या नोंदी तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचं अधिकृत सूत्रांनी वृत्तसंस्थेला सांगितलं. मंदिराच्या विश्वस्त मंडळानं क...

August 8, 2026 9:32 PM

views 25

कात्रज डेअरीकडून दूध विक्री दरात २ रुपयांची वाढ

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित अर्थात कात्रज डेअरीच्या दूध विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. विविध दुग्धजन्य पदार्थांच्या विक्री दरातही उत्पादना नुसार दहा टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात येणार आहे. हे सुधारित दर ११ ऑगस्टपासून लागू होतील. दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याण...

August 8, 2026 6:40 PM

views 23

E20 पेट्रोलमधील आर्द्रता, क्लोराइडचे दावे दिशाभूल करणारे – तेल विपणन कंपन्या

E 20 पेट्रोलमध्ये आर्द्रता आणि  क्लोराइड आढळल्याचे दावे करण्यात आले होते. परंतु हे सर्व दावे दिशाभूल करणारे आहेत, असं तेल विपणन कंपन्यांनी स्पष्ट केलं आहे. या संदर्भात देशव्यापी पातळीवर सखोल चाचण्या केल्या असून त्यात या दाव्याला कोणतीही पुष्टी मिळालेली नाही. हे इंधन गुणवत्ता निर्धारित मानकांमध्ये अस...

August 8, 2026 6:14 PM

views 28

टक्केवारी आणि पर्सेंटाइलमधील फरक समजून घेण्याचे सीईटी सेलचे आवाहन

प्रवेश परीक्षांमध्ये टक्केवारी आणि पर्सेंटाइल यातला फरक समजून घेण्याचं आवाहन सीईटी सेलने केलं आहे. टक्केवारी म्हणजे विद्यार्थ्याने एकूण गुणांपैकी किती गुण मिळवले याचे मोजमाप. तर पर्सेंटाइल हे त्या विद्यार्थ्याची परीक्षा दिलेल्या सर्व उमेदवारांच्या तुलनेत असलेली कामगिरी दर्शवते. अलीकडेच बारावीच्या गु...

August 8, 2026 2:55 PM

views 42

Korea Masters Super 300: अश्मिता चालिहा बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरीत  दाखल

दक्षिण  कोरियातल्या असान इथं सुरु असलेल्या ‘कोरिया मास्टर्स सुपर ३००’  बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा हिनं प्रवेश केला आहे. आज झालेल्या उपांत्य सामन्यात अश्मितानं भारताचीच  खेळाडू रक्षिता रामराजवर  २१-१३, १६-२१, २१-१३ नं मात करत अंतिम फेरी गाठली. ...

August 8, 2026 2:51 PM

views 29

हिमाचल प्रदेशात बस अपघातात सात जण ठार, तर अकरा प्रवासी जखमी

हिमाचल प्रदेशातल्या चंबा जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात एकूण सात जण ठार झाले तर अकरा प्रवासी जखमी झाले आहेत. एक खाजगी बस बैरागढ  इथून चंबाच्या दिशेनं जात असताना घाटात घसरुन पडली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं असून मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. जखम...

August 8, 2026 5:49 PM

views 30

जम्मू काश्मीरमधली अमरनाथ यात्रा स्थगित

देशाच्या उत्तरभागात मोसमी पावसाचा जोर कायम असून विविध राज्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झालं आहे.    जम्मू काश्मीरमधे संततधार पावसामुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर दरडी कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन अमरनाथ यात्रा आज थांबवण्यात आली आहे.    हिमाचल प्रदेशात सर्वदूर पाऊस होत आह...

August 7, 2026 8:22 PM

views 26

शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत ६ लाख २२ हजार २०७ शेतकऱ्यांच्या खात्यांमधे ५ हजार २९ कोटी रुपयांचा पहिला हफ्ता जमा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य सरकारनं आज ६ लाख २२ हजार २०७ शेतकऱ्यांच्या खात्यांमधे ५ हजार २९ कोटी रुपयांचा पहिला हफ्ता जमा केला.  कर्जमाफी योजनेच्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. पहिल्या टप्प्यात कर्जमाफीची रक्कम, त...