August 8, 2026 9:32 PM

printer

कात्रज डेअरीकडून दूध विक्री दरात २ रुपयांची वाढ

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित अर्थात कात्रज डेअरीच्या दूध विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. विविध दुग्धजन्य पदार्थांच्या विक्री दरातही उत्पादना नुसार दहा टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात येणार आहे. हे सुधारित दर ११ ऑगस्टपासून लागू होतील. दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांची बैठक कात्रज डेअरी इथं अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत वाढता उत्पादन खर्च, वाहतूक, पॅकिंग साहित्य आणि कच्च्या मालाच्या दरवाढीचा आढावा घेण्यात आला.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.