August 7, 2026 8:25 PM

views 36

पहिला ‘ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव’ भारतात होणार

पहिला 'ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव' पुढच्या वर्षी भारतात होणार असल्याची घोषणा ब्रिक्स वेव्हज बझारच्या पार्श्वभूमीवर आयोजित वार्ताहर परिषदेत आज करण्यात आली. याशिवाय NFDC, NFAI इत्यादी संस्थांनी ब्राझील, रशिया, व्हिएतनाम इत्यादी क्षेत्रातल्या संस्थांशी चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यास...

August 7, 2026 8:59 PM

views 80

राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या २२ कारागीरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान

 बारावा राष्ट्रीय हातमाग दिवस आज देशभरात साजरा होत आहे. ७ ऑगस्ट १९०५ रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग म्हणून स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली. त्याची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा होतो. या निमित्ताने वस्त्रोद्योग मंत्रालयाने राष्ट्रपती भवनात आज विशेष कार्यक्रम आयो...

August 7, 2026 8:19 PM

views 67

संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब

राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेत सकाळी ११ वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिरला यांनी येत्या ९ तारखेला भारत छोडो आंदो...

August 7, 2026 8:16 PM

views 48

कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताची रक्षिता आणि अश्मिता यांची उपांत्य फेरीत धडक

    कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत आज भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत रक्षिताने आपलीच सहकारी तन्वी शर्माचा २१-१८, १९-२१, १९-२१ असा पराभव केला. आता उपांत्य फेरीत तिचा सामना आणखी एक भारतीय खेळाडू अश्मिता चाल...

August 7, 2026 8:57 PM

views 62

डॉक्टरांवरील हल्ला प्रकरणी रमेश म्हात्रेंसह पाच जणांना जामीन

ठाणे महापालिका रुग्णालयातल्या डॉक्टरांवर हल्ला केल्या प्रकरणी अटकेत असलेल्या शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. तसंच या प्रकरणातल्या इतर चार आरोपींनाही उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला.

August 7, 2026 3:19 PM

views 52

ग्रँड चेस टूरचे विजेतेपद भारताच्या प्रज्ञानंदकडे

अमेरिकेत आयोजित 'ग्रँड चेस टूर सेंट लुईस रॅपिड अँड ब्लिट्झ' स्पर्धा भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद याने जिंकली. उप-अंतिम फेरीत उझबेकिस्तानचा ग्रँडमास्टर जावोखिर सिंदारोव्ह याच्याविरुद्ध सामना बरोबरीत सोडवून आपलं विजेतेपद निश्चित केलं.   त्याने एकूण ३५ पैकी २३ गुण मिळवून ही स्पर्धा पूर्ण केल...

August 7, 2026 2:52 PM

views 27

शिक्षण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज – शिक्षण मंत्री

बदलत्या काळानुसार शिक्षण क्षेत्रातही बदल घडणं आवश्यक असून त्यातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्याचं आवाहन केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केलं आहे.   ब्रिक्स देशांच्या शिक्षण मंत्र्यांची परिषद आज भुवनेश्वर इथं भरली आहे. त्यात ते बोलत होते.  भारत ब्रिक्स प...

August 7, 2026 2:45 PM

views 24

सुरक्षा उपाययोजनांमुळे रेल्वे अपघातांत लक्षणीय घट : अश्विनी वैष्णव

गेल्या काही वर्षांत राबवण्यात आलेल्या विविध सुरक्षा उपाययोजनांमुळे रेल्वे अपघातांची संख्या लक्षणीयरित्या घटल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.   गेल्या पाच आर्थिक वर्षांत रेल्वे सुरक्षिततेशी संबंधित कामांवर पाच लाख ४१ हजार कोटींपेक्षा जास्त रक्...

August 7, 2026 1:35 PM

views 72

अग्नी-4 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

अग्नी-४ या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी काल घेण्यात आली. ओडिशातल्या चंदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी केंद्रातून या क्षेपणास्त्राचं प्रक्षेपण झालं.   ही यशस्वी प्रक्षेपण चाचणी देशाच्या सामरिक क्षमता मजबूत करण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचा टप्पा आहे, असं संरक्षण मंत्रालयानं...

August 7, 2026 11:24 AM

views 62

आसाममध्ये पुरामुळे आतापर्यंत 97 जणांचा मृत्यू

आसाममध्ये पुरामुळे आतापर्यंत ९७ जणांचा मृत्यू झाला असून १५ जिल्ह्यांतील १ लाख ६८ हजार नागरिक पुरामुळे बाधित झाले आहेत. राज्यातील ४८० गावांमध्ये पुराचे पाणी अद्याप ओसरलेले नाही.