August 1, 2026 3:47 PM

views 14

व्हाईस ॲडमिरल ए एन प्रमोद यांनी आज नौदल उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.

व्हाईस ॲडमिरल ए एन प्रमोद यांनी आज नौदल उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.  १ जुलै १९९० पासून भारतीय नौदलाच्या सेवेत असलेले ए एन प्रमोद यांना ३६ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. भारतीय नौदलात त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण आणि धोरणात्मक नेतृत्व भूमिका सांभाळल्या असून ऑपरेशन सिंदूर मोहिमेचं नियोजन, सज्जता आणि इ...

August 1, 2026 3:46 PM

views 10

जुलैमध्ये वस्तू आणि सेवा कर संकलनात १५ पूर्णांक ४ शतांश टक्के वाढ

वस्तू आणि सेवा कर संकलनात जुलै महिन्यात १५ पूर्णांक ४ शतांश टक्के भर पडली असून ते २ लाख११हजार  कोटी रुपयांच्या वर पोहोचलं आहे. गेल्या वर्षीच्या जुलैमधे एकूण जीएसटी संकलन १ लाख ८३ हजार कोटी रुपये झालं होतं. यंदाच्या संकलनात महिन्यात केंद्रीय वस्तू आणि सेवा कर महसूल ३९ हजार ८३५ कोटी रुपये होता, तर राज...

August 1, 2026 3:45 PM

views 11

तैपेई बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा अंतिम फेरीत दाखल

तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा महिला एकेरीच्या अंतिम फेरीत दाखल झाली आहे. उपान्त्य सामन्यात तिने चिनी तैपेईच्या हुआंग यु सुनचा २१-१२, २१-११ असा पराभ केला. अंतिम सामन्यात तिची गाठ व्हिएतनामची थुय लिन एंगुयेन हिच्याशी पडेल.

August 1, 2026 3:44 PM

views 13

व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत १९२ रुपये कपात

तेल विक्री कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत १९२ रुपये कपात केली असून नवे दर आजपासून लागू होणार आहेत. यानुसार दिल्लीत १९ किलो वजनाच्या व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरची किंमत २ हजार ७३८ रुपये, कोलकाता मध्ये २ हजार ८७२ रुपये, मुंबईत २ हजार ६९० रुपये तर  चेन्नईत २ ह...

August 1, 2026 3:44 PM

views 17

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आंध्रप्रदेशात भोगपुरम विमानतळाचं उद्घाटन

आंध्रप्रदेशात भोगापुरम इथं अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजारिपु राममोहन नायडू, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.  ५ हजार कोटी रुपये खर्चू...

August 1, 2026 3:50 PM

views 22

केरळमध्ये मुसळधार पाऊस; १४ जिल्ह्यांना रेड अलर्ट

केरळमध्ये पावसाची संततधार सुरु असून हवामान विभागानं राज्यातल्या १४ जिल्ह्यांना आज अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. राज्यात ठिकठिकाणी पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं असून शैक्षणिक संस्थांना आज सुट्टी देण्यात आली आहे.  केरळमध्ये कालपासून पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर...

August 1, 2026 3:35 PM

views 23

देशाच्या विविध भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज

भारतीय हवामान विभागाने आज पूर्व राजस्थान, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक किनारपट्टी कोकण, गोवा, आणि केरळमध्ये  मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उत्तरेकडील काही राज्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. गेल्या 4-5 दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या पावसाने अनेक भागात नुकसान झालं असून पूरस्...

August 1, 2026 3:30 PM

views 17

भारत आणि चीनमधला व्यापार आज सिक्कीममधील ‘नथू-ला’ खिंडीतून पुन्हा सुरू

भारत आणि चीन देशांमधला सीमावर्ती व्यापार आज सिक्कीममधील 'नथू-ला' खिंडीतून पुन्हा सुरू होत आहे. यामुळे या दोन शेजारी देशांमधील एका महत्त्वाच्या व्यापारी मार्गाचं पुनरुज्जीवन होणार आहे. या व्यापारामुळे कोविड-19 संकट काळात 2020 पासून लागू असलेली सहा वर्षांची स्थगिती संपुष्टात आली आहे. या व्यापारामुळे स...

August 1, 2026 3:29 PM

views 17

देशातील भरकटलेल्या तरुणाईला राष्ट्रनिर्मिती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून योग्य मार्गावर आणलं पाहिजे, प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, शिवीगाळ आणि द्वेषातून कोणत्याही समस्या सुटू शकत नाहीत. भरकटलेल्या तरुणांबद्दल सहानुभूती बाळगण्याचं आवाहन करत त्यांना शिक्षा करण्याऐवजी राष्ट्रनिर्मिती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून त्यांना योग्य मार्गावर आणलं पाहिजे, असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांन...

August 1, 2026 3:29 PM

views 30

सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंध सुधारण विधेयक २०२६ ला राष्ट्रपतीची मंजुरी

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंध सुधारण विधेयक 2026ला मंजुरी दिली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांत हे विधेयक मंजूर करण्यात आलं होतं. सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आणि जलदगती न्यायालयांची स्थापना करणे, हा या विधेयकाचा मुख्...