जेष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांंचं निधन

‘डोह’कार श्रीवि म्हणून ओळखले जाणारे जेष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचं आज दुपारी निधन झालं.  ते ९२ वर्षांचे होते.  श्री. वि. कुलकर्णी यांच्या  डोह या पहिल्याच ललित लेखसंग्रहाने त्यांना मराठी साहित्यविश्वात महत्वाचे स्थान मिळवून दिले.

 

कराड इथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. कराडच्या महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेने त्यांचा गौरव केला आहे. कराड नगरपरिषदेनेही त्यांचा नुकताच नागरी सत्कार केला होता. 

 

मराठी साहित्यातील सेवाव्रती पांथस्थाने निरोप घेतल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना आदरांजली अर्पण केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही कुलकर्णी यांना आदरांजली अर्पण केली आहे. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.