तेहलका या नियतकालिकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने बलात्कार प्रकरणी दोषी ठरवलं आहे. पाच वर्षांपूर्वी या प्रकरणी गोवा सत्र न्यायालयाने तेजपाल यांच्या निर्दोष मुक्ततेचा निर्णय आज उच्च न्यायालयाने रद्द केला. आपण राजकीय बळी असून दोन मुलींचे वडील असल्याचा दावा करत तेजपाल यांनी शिक्षेत सवलत देण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती.
२०१३मध्ये एका सहकाऱ्यावर बलात्कार केल्याचा आरोप तेजपाल यांच्यावर होता. २०२१मध्ये गोवा सत्र न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केलं होतं. त्यानंतर गोवा सरकारने उच्च न्यायालयात या निकालाला आव्हान दिलं होतं.
या प्रकरणी न्यायमूर्ती नीला गोखले आणि न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. या प्रकरणाचा निकाल आज दुपारी जाहीर होणार आहे.