August 6, 2026 3:27 PM

views 34

तेहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल बलात्कार प्रकरणात दोषी

तेहलका या नियतकालिकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने बलात्कार प्रकरणी दोषी ठरवलं आहे. पाच वर्षांपूर्वी या प्रकरणी गोवा सत्र न्यायालयाने तेजपाल यांच्या निर्दोष मुक्ततेचा निर्णय आज उच्च न्यायालयाने रद्द केला. आपण राजकीय बळी असून दोन मुलींचे वडील असल्याचा दावा करत तेजपाल यांनी शिक्षेत सवलत देण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती.   २०१३मध्ये एका सहकाऱ्यावर बलात्कार केल्याचा आरोप तेजपाल यांच्यावर होता. २०२१मध्ये गोवा सत्र न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त ...

August 31, 2024 8:11 PM

views 57

बलात्कार आणि पॉक्सो प्रकरणे हाताळण्यासाठी विशेष जलदगती न्यायालये स्थापन करण्याची केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांची ममता बॅनर्जी यांना विनंती

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आर.जी. कार रुग्णालयामधील बलात्कार आणि पॉक्सो प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी विशेष जलदगती न्यायालये स्थापन करण्याची विनंती पुन्हा पत्राद्वारे केली आहे.  पश्चिम बंगालमधल्या सध्याच्या जलदगती न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या खटल्यांवर चिंता अन्नपूर्णा देवी यांनी चिंता व्यक्त केली. पश्चिम बंगालमध्ये ८८ जलदगती न्यायालये स्थापन करण्यात आली आहेत, पण ती केंद्र सरकारच्या योजनेच्या शिफारशींनुसा...