August 6, 2026 7:15 PM

printer

SIR नंतरही पात्र मतदारांना मतदारयादीत नाव नोंदवता येणार – निवडणूक आयोग

SIR अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदारयादीत नाव समाविष्ट करता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. राज्यात सध्या SIR ची प्रक्रीया सध्या सुरू असून १७ ऑगस्टपर्यंत गृहभेटीत गणना अर्ज भरुन द्यायचे आहेत. त्यानंतर २४ ऑगस्टला प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध होईल.

 

या प्रारुप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना ६, घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करुन मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. त्यानंतर २७ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होेणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचे नाव समाविष्ट होऊ शकेल. अंतिम मतदार यादीतही नाव नसलेल्या मतदारांना त्यानंतर सुद्धा मतदार यादीत नाव नोंदवता येईल, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.