अंध महिला टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा राजभवनात गौरव!

अंध महिलांच्या टी-20 क्रिकेट विश्वचषकावर भारताचं नाव कोरणाऱ्या अंध महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या सदस्यांचा काल राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

भारतीय अंध महिला क्रिकेट संघाच्या तसंच खेळाडुंच्या प्रेरणादायी प्रवासावर आधारित देख ले! इंडिया; या माहितीपटाच्या प्रदर्शनानिमित्त या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं.