August 6, 2026 1:30 PM

views 16

अंध महिला टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा राजभवनात गौरव!

अंध महिलांच्या टी-20 क्रिकेट विश्वचषकावर भारताचं नाव कोरणाऱ्या अंध महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या सदस्यांचा काल राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.   भारतीय अंध महिला क्रिकेट संघाच्या तसंच खेळाडुंच्या प्रेरणादायी प्रवासावर आधारित देख ले! इंडिया; या माहितीपटाच्या प्रदर्शनानिमित्त या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं.

November 7, 2025 8:56 PM

views 164

महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या महाराष्ट्रातल्या खेळाडूंचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

ICC महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ चं विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघातल्या स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव, या महाराष्ट्रातल्या तीन खेळाडूंचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या वर्षा निवासस्थानी सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी या तिघींना शाल, पुष्पगुच्छ, तसंच प्रत्येकी सव्वा दोन कोटी रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित केलं. तर या संघाचे प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांना साडेबावीस लाख रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आलं. तर सर्व महिला क्रिकेट संघाचा सहाय्यक कर्मचारी वर्गालाही ११...

July 12, 2025 7:50 PM

views 36

विम्बल्डन टेनिस स्पर्धेत महिलांचा अंतिम सामना इगा श्वियांतेक आणि अमांडा अनिसिमोव्हा यांच्यात रंगणार

विम्बल्डन टेनिस स्पर्धेत आज महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात इगा श्वियांतेक हिच्यासमोर अमांडा अनिसिमोव्हा हिचं आव्हान असेल. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री साडेआठला सुरु होईल.   तर उद्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात अग्रमानांकित यानिक सिनर आणि गतविजेता कार्लोस अल्काराज एकमेकांविरुद्ध मैदानात उतरतील.