प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ हटवल्याबद्दल मेटाचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांची माफी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची फेसबुक पोस्ट तात्पुरती हटवल्याबद्दल मेटा प्लॅटफॉर्म्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी ‘मार्क झुकरबर्ग’ यांनी माफी मागितल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं. तसंच कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बाल लैंगिक शोषणाशी संबंधित मजकूर आणि डीपफेकमधल्या चुका मान्य केल्या असून, ‘एका विशिष्ट प्रकारच्या मजकुराला प्राधान्य देण्यासाठी मोठी रक्कम देण्यात आल्याचं मान्य केल्याचं सरकारने जारी केलेल्या  प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. 

 

फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपची मालकी असलेल्या ‘मेटा’च्या जागतिक व्यवहार विभागाचे प्रमुख ‘जोएल कॅप्लान’ यांच्या नेतृत्वाखालच्या पथकानं काल माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. त्यानंतर मेटाने आपल्या प्लॅटफॉर्म्सच्या कामकाजात त्रुटी राहिल्याचं मान्य केलं असं यात म्हटलं आहे. 

 

    मेटाच्या प्रणाली निकामी का झाल्या आणि अशा समस्यांचं निराकरण करताना कंपनीला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला, हे सरकारला जाणून घ्यायचं आहे, तसंच भारताच्या कायदेशीर आवश्यकता आणि त्यांचं पालन सुनिश्चित करण्याची कंपनीची भूमिका, याबाबत प्लॅटफॉर्म्सना अधिक स्पष्ट संदेश देणं आवश्यक असल्याचं यात म्हटलं आहे. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.