केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर आहेत. राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या नवीन कार्यालयाचं उद्घघाटन त्यांच्या हस्ते झालं. राज्यातल्या नागरी सहकारी बँक महासंघ तसंच जिल्हा बँक संघटनांच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास प्राधिकरण आणि राष्ट्रीय न्यायवैज्ञानिक विज्ञान विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार होत आहे. त्यानंतर सहकारी बँकांची सायबर सुरक्षा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशानं उभारण्यात आलेल्या सुरक्षा संचालन केंद्राचं उद्घघाटनही शहा यांच्या हस्ते झालं.