August 7, 2026 8:22 PM

printer

शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत ६ लाख २२ हजार २०७ शेतकऱ्यांच्या खात्यांमधे ५ हजार २९ कोटी रुपयांचा पहिला हफ्ता जमा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य सरकारनं आज ६ लाख २२ हजार २०७ शेतकऱ्यांच्या खात्यांमधे ५ हजार २९ कोटी रुपयांचा पहिला हफ्ता जमा केला.  कर्जमाफी योजनेच्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. पहिल्या टप्प्यात कर्जमाफीची रक्कम, तर दुसऱ्या टप्प्यात प्रोत्साहनपर रक्कम  जमा केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 

 

 

आषाढी एकादशीला राज्य सरकारनं पहिली यादी जाहीर केली होती. त्यांच्या आधार प्रमाणीकरणाचं काम सुरू असून प्रमाणीकरण झालेल्या खात्यांमध्ये कर्जमाफी योजनेचे पैसे जमा करण्याचं सुरू झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.