August 8, 2026 3:02 PM

printer

आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन आपल्या ज्ञानाचा फायदा देशाला मिळावा याचा प्रयत्न करावा-प्रधानमंत्री

आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन आपल्या ज्ञानाचा फायदा देशाला मिळावा याचा प्रयत्न करावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आयआयटी दिल्लीच्या ५७व्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यार्थ्यांची स्वप्न आणि आत्मनिर्भरतेची आस विकसित भारताची पायभरणी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यशस्वी विद्यार्थ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं. यशस्वी विद्यार्थ्यांमधे विद्यार्थिनींचं प्रमाण अधिक असतं तर अधिक आनंद झाला असता असं ते म्हणाले.

 

आयआयटी दिल्लीच्या सोनिपत परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक परमप्रज्ञा या उच्च क्षमता प्रसंगणक सुविधेचं उद्घाटन त्यांनी केलं.  

 

केंद्रीय शिक्षम मंत्री प्रल्हाद जोशी, आयआयटी दिल्लीच्या संचालक मंडळाचे सदस्य आणि इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.