August 8, 2026 6:14 PM

printer

टक्केवारी आणि पर्सेंटाइलमधील फरक समजून घेण्याचे सीईटी सेलचे आवाहन

प्रवेश परीक्षांमध्ये टक्केवारी आणि पर्सेंटाइल यातला फरक समजून घेण्याचं आवाहन सीईटी सेलने केलं आहे. टक्केवारी म्हणजे विद्यार्थ्याने एकूण गुणांपैकी किती गुण मिळवले याचे मोजमाप. तर पर्सेंटाइल हे त्या विद्यार्थ्याची परीक्षा दिलेल्या सर्व उमेदवारांच्या तुलनेत असलेली कामगिरी दर्शवते. अलीकडेच बारावीच्या गुणांच्या तुलनेत CET परीक्षेत अत्यंत उच्च पर्सेंटाइल मिळवलेल्या सुमारे १ हजार २०० विद्यार्थ्यांबाबत निर्माण झालेल्या संभ्रमावर सीईटी सेलनं हे स्पष्टीकरण दिलं आहे.

 

या परीक्षा विश्लेषणात्मक विचारक्षमता, समस्या सोडवण्याची क्षमता, वेग, अभिक्षमता आणि समान, प्रमाणित परीक्षेतील कामगिरी यांचे मूल्यमापन करतात. त्यामुळे अशाप्रकारची तफावत आढळूत येत असल्याचं सीईटी सेलनं म्हटलं आहे. जेईई सारख्या इतर परीक्षांमध्येही अनेक विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षेतील कामगिरी बारावीच्या गुणांपेक्षा अधिक चांगली असते, याकडे सीईटी सेलनं लक्ष वेधलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.