August 8, 2026 9:32 PM

printer

मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात देणगी अपहाराच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात देणग्यांचा अपहार होत असल्याच्या आरोपांची समग्र चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मंदिराच्या गेल्या ५ वर्षातल्या नोंदी तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचं अधिकृत सूत्रांनी वृत्तसंस्थेला सांगितलं. मंदिराच्या विश्वस्त मंडळानं काल २०२३ ते २०२६ दरम्यान मिळालेल्या देणग्यांच्या तपशीलवार नोंदी काल मुख्यमंत्र्यांना भेटून सादर केल्या, त्यानंतर त्या आधीच्या वर्षातल्या नोंदी तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. सिद्धीविनायक मंदिरात १८ कोटी रुपयांच्या देणग्यांचा अपहार झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. याप्रकरणी ९ कर्मचाऱ्यांना अटक झाली होती.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.