August 11, 2026 8:30 PM

views 81

२३ वर्षांखालील राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत भारतानची पहिल्याच दिवशी १७ पदकांची कमाई

   नायजेरियाची राजधानी लागोसमध्ये सुरू असलेल्या  23 वर्षांखालील राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत भारताने, स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी 17 पदकं जिंकत दमदार सुरुवात केली आहे.   यात, चार सुवर्ण, चार रौप्य आणि नऊ कास्य पदकांचा समावेश आहे. या खेळाच्या तीनही प्रकारात भारतीय खेळाडूंनी वर्चस्व गाजवलं.

August 11, 2026 10:31 AM

views 37

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत तिरंगा यात्रा

२०४७मध्ये विकसित भारताचं स्वप्न साकार करायचं असेल, तर छोट्या गोष्टींमध्ये, जाती-धर्माच्या भेदांमध्ये अडकून चालणार नाही, तर एकत्र चालायचा मंत्र अंगिकारायला हवा, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केलं आहे. वरळीत आज त्यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा काढण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. ज्या त...

August 10, 2026 8:26 PM

views 39

करनिर्धारण आणि इतर कायदे दुरुस्ती विधेयकाला संसदेची मंजुरी

कर आकारणी आणि इतर कायदे, सुधारणा विधेयक, २०२६ आज संसदेनं मंजूर केलं. राज्यसभेनं चर्चेनंतर हे विधेयक लोकसभेकडे परत पाठवलं. लोकसभेने हे विधेयक यापूर्वीच मंजूर केलं होतं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक मांडलं होतं. या विधेयकाद्वारे 'पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टिम्स ॲक्ट, २००७', 'आयकर...

August 10, 2026 8:24 PM

views 13

राम मंदिर देणगी अपहार प्रकरणातल्या सर्व ८ आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत २४ ऑगस्टपर्यंत वाढ

राम मंदिर देणगी अपहार प्रकरणातल्या सर्व ८ आरोपींची न्यायालयीन कोठडी भ्रष्टाचार विरोधी विशेष न्यायालयानं २४ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. पोलिसांनी सर्व आरोपींची त्यांच्या पोलीस कोठडीच्या काळात स्वतंत्र चौकशी केली आहे.

August 10, 2026 4:50 PM

views 547

लातूर, नांदेड, धाराशिव, बीडमधील शेतकऱ्यांना कर्जमाफी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६ अंतर्गत लातूर, नांदेड, धाराशिव आणि बीड या चार जिल्ह्यांतल्या ६१ हजार २१६ शेतकऱ्यांना एकूण ४६२ कोटी ८१ लाख रुपये वितरित करण्यात आले आहे. सहकार विभागाचे लातूर विभागीय सहनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी ही माहिती दिली. यात लातूर जिल्ह्यात सुमारे ए...

August 10, 2026 3:20 PM

views 39

आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या आणि अंतिम आठवड्याला आजपासून सुरुवात झाली. मात्र, नीट पेपरफुटीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या कामकाजात आजही वारंवार अडथळे आले. गदारोळ सुरू राहिल्यामुळे लोकसभेचं कामकाज...

August 10, 2026 3:07 PM

views 19

झारखंड भरती परीक्षेतल्या गैरप्रकार प्रकरणात ईडीचा तपास सुरू

झारखंडमध्ये भरती परीक्षेतल्या कथित गैरप्रकाराच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जयपाल सिंह मुंडा स्टेडियमहून झारखंड विधानसभेच्या दिशेनं मोर्चाला सुरुवात केली आहे. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा आज १७वा दिवस आहे. ...

August 10, 2026 2:56 PM

views 58

गडचिरोलीत अनुदानित आश्रमशाळेत ६ विद्यार्थिनींना सर्पदंश, तीन जणींचा मृत्यू

गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेत काल रात्री विषारी सापाच्या दंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. तर आणखी ३ विद्यार्थिनींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी एकीची प्रकृती गंभीर असून, इतर १५ विद्यार्थिनींना निरीक्षणाखाली ठेवल्याचं  डॉक्टरांनी सांग...

August 8, 2026 9:08 PM

views 22

दर्यावर्दींची सुरक्षा, सन्मान आणि सहाय्य यासाठी केंद्रसरकार वचनबद्ध-सर्बानंद सोनोवाल

दर्यावर्दींची सुरक्षा, सन्मान आणि सहाय्य यासाठी केंद्रसरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत खलाशांचं संरक्षण, सुरक्षा आणि कल्याण या विषयावर आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात बोलत होते. भारत हा जगातल्या अग्रगण्य दर्यावर्दी देशा...

August 8, 2026 9:22 PM

views 42

सर्वसामान्य नागरिकांना युपीआयद्वारे केलेल्या व्यवहारासाठी कुठलेही शुल्क द्यावे लागणार नाही

सर्वसामान्य नागरिकांना युपीआयद्वारे केलेल्या व्यवहारासाठी कुठलेही शुल्क द्यावे लागणार नाही असं स्पष्टीकरण केंद्र सरकारनं दिलं आहे. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला युपीआयद्वारे पैसे हस्तांतरित केल्यावर कुठलेही शुल्क द्यावे लागणार नाही. तसंच ग्राहकांनीही कुठलीही खरेदी केल्यावर युपीआयद्वारे पैसे दिले...