सर्वसामान्य नागरिकांना युपीआयद्वारे केलेल्या व्यवहारासाठी कुठलेही शुल्क द्यावे लागणार नाही असं स्पष्टीकरण केंद्र सरकारनं दिलं आहे. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला युपीआयद्वारे पैसे हस्तांतरित केल्यावर कुठलेही शुल्क द्यावे लागणार नाही. तसंच ग्राहकांनीही कुठलीही खरेदी केल्यावर युपीआयद्वारे पैसे दिले तरी त्यांना शुल्क द्यावं लागणार नाही असं अर्थमंत्रालयानं स्पष्ट केलंय. या व्यवहारांसाठी MDR अर्थात Merchant Discount Rate शुल्क लागू झालं तर ते केवळ मर्यादित व्यापाऱ्यांना, ठराविक रकमेच्या पलीकडे आणि मर्यादित प्रमाणात असेल असं ते म्हणाले. UPI ची यंत्रणा दीर्घकाळ शाश्वत रहावी, त्यात तांत्रिक सुधारणा होत रहाव्या आणि संभाव्य धोक्यांपासून ती सुरक्षित असावी यासाठी सरकारनं Payment and Settlement Systems कायदा आणल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे.
News On AIR | August 8, 2026 9:22 PM
सर्वसामान्य नागरिकांना युपीआयद्वारे केलेल्या व्यवहारासाठी कुठलेही शुल्क द्यावे लागणार नाही