August 10, 2026 3:07 PM

printer

झारखंड भरती परीक्षेतल्या गैरप्रकार प्रकरणात ईडीचा तपास सुरू

झारखंडमध्ये भरती परीक्षेतल्या कथित गैरप्रकाराच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जयपाल सिंह मुंडा स्टेडियमहून झारखंड विधानसभेच्या दिशेनं मोर्चाला सुरुवात केली आहे. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा आज १७वा दिवस आहे. काही परीक्षा रद्द कराव्यात आणि कथित गैरप्रकारांची चौकशी सीबीआयमार्फत करावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. यापैकी जवळपास ९८ टक्के मागण्या मान्य केल्याचा दावा सरकारनं केला आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी यांच्यासह भाजपाच्या काही नेत्यांना मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शनं करताना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

 

    दरम्यान, झारखंडमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाबाबत काँग्रेसची भूमिका दुटप्पी असल्याची टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे. दिल्लीतल्या विद्यार्थी आंदोलनाविषयी राजकीय भूमिका घेणारा काँग्रेस पक्ष आता झारखंडमधल्या आंदोलनावर मौन बाळगत असल्याचं भाजपने म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.