दर्यावर्दींची सुरक्षा, सन्मान आणि सहाय्य यासाठी केंद्रसरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत खलाशांचं संरक्षण, सुरक्षा आणि कल्याण या विषयावर आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात बोलत होते. भारत हा जगातल्या अग्रगण्य दर्यावर्दी देशांपैकी एक म्हणून उदयास आल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी, ई-समुद्र या डिजिटल सागरी प्रशासकीय मंचाचं अनावरण करण्यात आलं. देशभरातील सागरी उद्योग, दर्यावर्दी संघटना, भर्ती तसंच नियुक्ती संस्था, सागरी प्रशिक्षण संस्था आणि सागरी व्यावसायिकांचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
News On AIR | August 8, 2026 9:08 PM
दर्यावर्दींची सुरक्षा, सन्मान आणि सहाय्य यासाठी केंद्रसरकार वचनबद्ध-सर्बानंद सोनोवाल