August 10, 2026 2:56 PM

printer

गडचिरोलीत अनुदानित आश्रमशाळेत ६ विद्यार्थिनींना सर्पदंश, तीन जणींचा मृत्यू

गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेत काल रात्री विषारी सापाच्या दंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. तर आणखी ३ विद्यार्थिनींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी एकीची प्रकृती गंभीर असून, इतर १५ विद्यार्थिनींना निरीक्षणाखाली ठेवल्याचं  डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.