August 10, 2026 4:50 PM

printer

लातूर, नांदेड, धाराशिव, बीडमधील शेतकऱ्यांना कर्जमाफी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६ अंतर्गत लातूर, नांदेड, धाराशिव आणि बीड या चार जिल्ह्यांतल्या ६१ हजार २१६ शेतकऱ्यांना एकूण ४६२ कोटी ८१ लाख रुपये वितरित करण्यात आले आहे. सहकार विभागाचे लातूर विभागीय सहनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी ही माहिती दिली. यात लातूर जिल्ह्यात सुमारे एकशे साठ कोटी, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यात प्रत्येकी सुमारे एकशे सहा कोटी तर बीड जिल्ह्यात सुमारे एक्क्याण्णव कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. राज्यातल्या कर्जखात्यांचं आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या पात्र शेतक-यांच्या खात्यात निधी जमा झाला असून, खरीप पीक कर्ज तातडीनं वितरित करण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्या असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.