August 8, 2026 2:55 PM

printer

Korea Masters Super 300: अश्मिता चालिहा बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरीत  दाखल

दक्षिण  कोरियातल्या असान इथं सुरु असलेल्या ‘कोरिया मास्टर्स सुपर ३००’  बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा हिनं प्रवेश केला आहे. आज झालेल्या उपांत्य सामन्यात अश्मितानं भारताचीच  खेळाडू रक्षिता रामराजवर  २१-१३, १६-२१, २१-१३ नं मात करत अंतिम फेरी गाठली. या आधी उपांत्यपूर्व फेरीत अश्मितानं जपानच्या हिना अके या जागतिक क्रमवारीत २२ व्या स्थानावर असलेल्या खेळाडूचा पराभव केला होता.