राष्ट्रीय

August 5, 2026 7:43 PM

views 55

सर्वोच्च न्यायालय (न्यायाधीशांची संख्या) सुधारणा विधेयक, २०२६ लोकसभेत मंजूर

संसदेने 'सर्वोच्च न्यायालय (न्यायाधीशांची संख्या) सुधारणा विधेयक, २०२६' मंजूर केलं. राज्यसभेने चर्चेनंतर हे विधेयक लोकसभेकडे परत पाठवलं. केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी हे विधेयक राज्यसभेत मांडलं. लोकसभेनं हे विधेयक आधीच मंजूर केलं होतं. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची सं...

August 5, 2026 11:48 AM

views 29

कोरिया मास्टर्स सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून सुरुवात; 33 भारतीय खेळाडू सहभागी

दक्षिण कोरियातील आसन इथं कोरिया मास्टर्स सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेला आजापसून सुरुवात होत आहे. तैपेई खुल्या महिला एकेरी स्पर्धेचं अजिंक्यपद मिळवणारी तन्वी शर्मा आणि किदाम्बी श्रीकांत यांच्यासह आघाडीचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत आहेत.  भारताकडून या स्पर्धेत पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, म...

August 5, 2026 11:44 AM

views 42

उत्तर प्रदेशात ६० वर्षांवरील महिलांना बस प्रवास मोफत

उत्तर प्रदेश सरकार 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून मोफत प्रवासाची सुविधा देणार आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो ज्येष्ठ महिलांना आर्थिक दिलासा मिळेल आणि त्यांना धार्मिक, सामाजिक, कौ...

August 5, 2026 11:21 AM

views 36

भुवनेश्वरमध्ये आजपासून ‘ब्रिक्स’ शिक्षण मंत्र्यांची बैठक

'ब्रिक्स' शिक्षण मंत्र्यांची बैठक आणि 3 री 'ब्रिक्स' वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आजपासून भुवनेश्वर इथं होत आहे. या महिन्याच्या सात तारखेपर्यंत ही बैठक चालणार असून, यात 'ब्रिक्स' सदस्य देशांचे शिक्षण मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिनिधी एकत्र येणार आहेत, अशी माहिती शिक्षण मंत्रालयानं दिली आहे.  या बैठकी...

August 5, 2026 11:18 AM

views 42

ब्रिक्स सांस्कृतिक प्रतिनिधींची बैठक भोपाळमध्ये होणार

ब्रिक्स देशांमधील सांस्कृतिक सहकार्य वाढवणं आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर एकमत साधणं या उद्देशानं सदस्य देशांच्या सांस्कृतिक प्रतिनिधींची आणि मंत्र्यांची एक बैठक आजपासून भोपाळ इथं आयोजित करण्यात आली आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली आठ ऑगस्टपर्यंत ही बैठक होणार असल्याचं सांस्कृतिक मंत्रालयानं म्हटलं आहे. ...

August 4, 2026 8:52 PM

views 42

नवी दिल्लीत पुढच्या आठवड्यात होणाऱ्या ब्रिक्स परिषदेसाठी बांगला देशाचे प्रधानमंत्री तारिक रहमान यांना भारताकडून आमंत्रण

भारतानं बांगलादेशचे प्रधानमंत्री तारिक रहमान यांना ब्रिक्स परिषदेसाठी निमंत्रण दिलं आहे. येत्या १२ आणि १३ सप्टेंबरला ब्रिक्सची वार्षिक परिषद नवी दिल्ली इथं होणार आहे. त्याला बिम्सटेक संघटनेचे अध्यक्ष या नात्याने उपस्थित राहावं असं या निमंत्रणात म्हटलं आहे.   परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्...

August 4, 2026 8:46 PM

views 42

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर यंदा बंदी शक्य नसल्याचं राज्य सरकारचं मुंबई उच्च न्यायालयात निवेदन

पीओपी अर्थात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर यंदा बंदी घालता येणं शक्य नाही परंतु टप्प्याटप्प्यानं त्या बंद करू, असं आश्वासन राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात दिलं आहे. त्याचवेळी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या ६ फुटांपेक्षा जास्त उंचीच्या गणेश मूर्तींचं विसर्जन समुद्रात करण्याची परवानगी यंदाही द्यावी अशी व...

August 4, 2026 8:32 PM

views 74

राज्यातल्या SIR प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून आणखी मुदतवाढ

केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या SIR अर्थात मतदार याद्याच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला दुसऱ्यांना मुदतवाढ दिली आहे. आता गृहभेटी ८ ऑगस्टऐवजी १७ ऑगस्टपर्यंत करता येतील. प्रारुप मतदार यादी १७ ऐवजी २४ ऑगस्टला प्रकाशित होईल.   त्यावरच्या हरकती २३ सप्टेंबर पर्यंत दाखल करता येतील आणि त्यावर...

August 4, 2026 8:25 PM

views 27

प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत 50 लाखांहून अधिक कुटुंबांनी बसवली सौर ऊर्जा प्रणाली

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत देशभरात आतापर्यंत ५० लाखांहून अधिक कुटुंबांनी घरावर सौर ऊर्जा प्रणाली बसवल्याची माहिती केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रह्लाद जोशी यांनी दिली.   या योजनेत १९ लाखांहून अधिक कुटुंबाचं वीजबिल शून्यावर आल्याचं जोशी यांनी समाजमाध्यमवरच्या संदेशात ...

August 4, 2026 7:55 PM

views 36

सायबर फसवणुकीची प्रकरणं रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं देशव्यापी दिशानिर्देश जारी

सायबर फसवणुकीची प्रकरणं रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज देशव्यापी दिशानिर्देश जारी केले. अशा गुन्ह्यांमधून आलेले पैसे जमा करणं, ट्रान्सफर करणं आणि हस्तगत करण्यासाठी सायबर गुन्हेगार जी बँक खाती वापरतात, त्यांना आळा घालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं एका महिन्याच्या आत एक प्रमाण कार्यपद्धती तयार क...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.