भारतानं बांगलादेशचे प्रधानमंत्री तारिक रहमान यांना ब्रिक्स परिषदेसाठी निमंत्रण दिलं आहे. येत्या १२ आणि १३ सप्टेंबरला ब्रिक्सची वार्षिक परिषद नवी दिल्ली इथं होणार आहे. त्याला बिम्सटेक संघटनेचे अध्यक्ष या नात्याने उपस्थित राहावं असं या निमंत्रणात म्हटलं आहे.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. ब्रिक्स देशांखेरीज इतरही देशांना यजमान या नात्यानं भारताने आमंत्रण दिलं आहे.