August 4, 2026 8:52 PM

views 41

नवी दिल्लीत पुढच्या आठवड्यात होणाऱ्या ब्रिक्स परिषदेसाठी बांगला देशाचे प्रधानमंत्री तारिक रहमान यांना भारताकडून आमंत्रण

भारतानं बांगलादेशचे प्रधानमंत्री तारिक रहमान यांना ब्रिक्स परिषदेसाठी निमंत्रण दिलं आहे. येत्या १२ आणि १३ सप्टेंबरला ब्रिक्सची वार्षिक परिषद नवी दिल्ली इथं होणार आहे. त्याला बिम्सटेक संघटनेचे अध्यक्ष या नात्याने उपस्थित राहावं असं या निमंत्रणात म्हटलं आहे.   परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. ब्रिक्स देशांखेरीज इतरही देशांना यजमान या नात्यानं भारताने आमंत्रण दिलं आहे.

January 2, 2026 10:19 AM

views 52

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्या दिल्लीत पिप्रहवा बुद्ध अवशेषांच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचं उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्लीतील राय पिथोरा सांस्कृतिक संकुलात भगवान गौतम बुद्धांशी संबंधित पिप्रहवा अवशेषांच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचं उद्घाटन करणार आहेत. एक शतकाहून अधिक काळानंतर परत आणलेल्या, पिप्रहवा अवशेषांसह राष्ट्रीय संग्रहालय, नवी दिल्ली आणि भारतीय संग्रहालय, कोलकाता यांच्या संग्रहात जतन केलेले पिप्रहवा अवशेष आणि इतर पुरातत्वीय साहित्य या प्रदर्शनात पहिल्यांदाच बघता येईल.   1898 मध्ये पिप्रहवा इथे सापडलेले अवशेष, प्राचीन बौद्ध धर्माच्या पुरातत्व अभ्यासात महत्वाचे आहे...

December 26, 2025 1:26 PM

views 105

सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या मुख्य सचिवांच्या राष्ट्रीय परिषदेला आज प्रारंभ

सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या मुख्य सचिवांची बैठक आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अध्यक्षतेखाली सुरु होत आहे.  तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीला प्रधानमंत्री  उद्या आणि परवा संबोधित करतील. राष्ट्रीय विकासासाठी रचनात्मक आणि शाश्वत संवादाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्याची भागीदारी मजबूत करण्यासाठी ही परिषद महत्त्वाची मानली जात आहे.   या वर्षी  या परिषदेचा मुख्य विषय 'विकसित भारतासाठी मानवी भांडवल' असा असून यात राज्यं आणि केंद्र शासित प्रदेशांसाठी सर्वोत्तम कार्यपद्धती आणि धोरण...

December 8, 2025 9:36 AM

views 85

आजपासून नवी दिल्लीत युनेस्कोच्या आंतरसरकारी समितीचे २० वे अधिवेशन

  भारताचे 'विकास भी, विरासत भी' हे ब्रीदवाक्य म्हणजे आधुनिकीकरण आणि शहरीकरण करतानाच देशाची सांस्कृतिक वारसा जपण्याची वचनबद्धता आहे अशी खात्री प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केली. संयुक्त राष्ट्रांच्या वारसास्थळांच्या संवर्धनासाठी असलेल्या आंतरसरकारी समितीच्या 20 व्या सत्राच्या उद्घाटन समारंभाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांनी हा संदेश दिला आहे.    नवी दिल्ली इथं आजपासून सहा दिवसांच्या सत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. परंपरा जपताना कोणताही समुदाय अथवा कोणाचीही श्रध्दा लोप पावणार ...

November 17, 2025 9:27 AM

views 90

लोकशाहीमध्ये पत्रकारितेची भूमिका महत्त्वाची असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्र्यांचं मत

लोकशाहीमध्ये पत्रकारितेची भूमिका महत्त्वाची आहे, असं मत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत राष्ट्रीय वृत्तपत्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केलं. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन,  प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्ष न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यावेळी उपस्थित होत्या.   पत्रकारितेमध्ये प्रामाणिकपणा, चिकाटी आणि अचूक माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याची वचनबद्धता हवी, तसंच सत्याचा शोध घेण्याचं धैर्य हवं असं रंजना प्रकाश देसाई यावेळी म्हणाल्या.

October 26, 2025 1:09 PM

views 69

नवी दिल्ली इथं ७९व्या शौर्य दिनानिमित्त शौर्य रन २०२५ चं आयोजन

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आज नवी दिल्ली इथं ७९व्या शौर्य दिनानिमित्त आयोजित शौर्य रन २०२५ला हिरवा झेंडा दाखवला. लष्कराचे अधिकारी, जवान, धावपटू यांच्यासह १० हजारपेक्षा जास्त नागरिकांनी यात भाग घेतला आणि देशाच्या जवानांचं शौर्य, शिस्त आणि सर्वोच्च त्यागाला अभिवादन केलं.

October 14, 2025 1:23 PM

views 126

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मंगोलियाचे अध्यक्ष उख्ना यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष खुरेलसुख उखना यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. या बैठकीत द्विपक्षीय संबंधांचा सविस्तर आढावा घेतला जाणार असून चर्चेनंतर काही सामंजस्य करारांवर स्वाक्षरी होणं अपेक्षित आहे.    सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि लोकशाही मूल्यांमधील समानतेमुळे १९५५ पासून गेली ७० वर्ष भारत आणि मंगोलिया यांच्यात बहुस्तरीय घनिष्ठ भागीदारी प्रस्थापित झाली आहे. प्रथमच भारत भेटीवर आलेले मंगोलियाचे अध्यक्ष आज संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटणार आहेत.  ...

October 14, 2025 1:16 PM

views 82

जागतिक स्तरावरच्या संघटनांमधे सुधारणा आवश्यक असल्याचं संरक्षण  मंत्र्यांचं प्रतिपादन

संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेनेत योगदान देणाऱ्या देशांच्या प्रमुखांच्या संमेलनाला आज नवी दिल्ली इथं सुरुवात झाली. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेचं यजमानपद भारतीय लष्कराकडे आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या संमेलनात बोलताना, कालबाह्य झालेल्या आंतरराष्ट्रीय यंत्रणांमध्ये सुधारणांची गरज असल्याची भारताची भूमिका अधोरेखित केली.   काही देश उघडपणे आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन करत आहेत, तर काही देशांना या नियमांवर आपलं वर्चस्व ठेवायचं आहे. अशा परिस्थितीत नियमाधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्था कायम ...

August 27, 2025 6:30 PM

views 66

भारतीय प्रसारण सेवेतले वरिष्ठ अधिकारी विवेक कुमार गौर यांचं नवी दिल्लीत निधन

भारतीय प्रसारण सेवेतले वरिष्ठ अधिकारी विवेक कुमार गौर यांचं आज नवी दिल्लीत निधन झालं. ते ५९ वर्षांचे होते. १९९२ च्या तुकडीतले गौर यांनी गंगटोक इथल्या आकाशवाणी केंद्रातल्या प्रादेशिक वृत्त विभागात सेवेला प्रारंभ केला होता.   सध्या ते नवी दिल्लीत वृत्त सेवा विभागात कार्यरत होते. पत्रसूचना कार्यालय आणि क्षेत्रीय प्रसिद्धी संचालनालयातही त्यांनी काम केलं होतं.

August 13, 2025 10:26 AM

views 68

भारत सिंगापूर यांच्यातली तिसरी मंत्रीस्तरीय गोलमेज परिषद आज नवी दिल्लीत होणार

भारत सिंगापूर यांच्यातली तिसरी मंत्रीस्तरीय गोलमेज परिषद आज नवी दिल्लीत होणार आहे. केंद्रिय मंत्री डॉ. एस. जयशंकर, निर्मला सीतारामन, अश्विनी वैष्णव आणि पीयूष गोयल यामध्ये सहभागी होतील.   सिंगापूरचे उपप्रधानमंत्री आणि परराष्ट्र मंत्री बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली आहे. भारत आणि सिंगापूर यांच्यातल्या सहकार्याला नवी दिशा देण्याचं या गोलमेज परिषदांचं उद्दीष्ट असल्याचं मंत्रालयानं सांगितलं.