July 3, 2024 10:51 AM

views 62

ग्लोबल इंडिया कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषदेला आज प्रारंभ

ग्लोबल इंडिया कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषदेला आज नवी दिल्ली इथं प्रारंभ होत असून त्याचं उद्घाटन इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते झालं. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राचा प्रत्यक्ष वापर, त्याचे प्रशासन, त्यासाठीच्या बुद्धीकौशल्याचा विकास आणि या विषयातील नवोन्मेष कल्पनांना चालना देणं अशा विविध पैलूंवर सखोल चर्चा होणार आहे. जागतिक स्तरावर जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता विकासाला चालना देण्याचीआपली वचनबद्धता भारतानं यापूर्वीच अधोरेखित केल...

June 28, 2024 11:15 AM

views 60

MSME दिवस काल सर्वत्र उत्साहात साजरा

  जागतिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग अर्थात MSME दिवस काल सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला.केंद्रिय मंत्री जीतम राम मांझी यांनी काल नवी दिल्ली इथं झालेल्या उद्यमी भारत या कार्यक्रमांत दोन नवीन योजनांची घोषणा केली. MSME टीम आणि यशस्वीनी अशी या योजनांची नावं आहेत.   डिजीटल कॉमर्स क्षेत्रात ओपन नेटवर्कसाठी पाच लाख लघुउद्योगांना प्रोत्साहन देणं आणिमहिलांच्या उद्यमशीलतेला चालना देण्यासाठी तसंच ग्रामीण आणि मागास भागांत महिलांद्वारे चालवल्या जाणाऱ्या लघुउद्योगांना आवश्यक ती मदत आणि सहकार्य पुरवण्या...

June 25, 2024 3:17 PM

views 65

स्वच्छ इंधन निर्मितीच्या क्षमतेमुळे ऊसाचा भाव नव्या उंचीवर पोहोचला – मंत्री प्रल्हाद जोशी

स्वच्छ इंधन निर्मितीच्या क्षमतेमुळे ऊसाचा भाव नव्या उंचीवर पोहोचला आहे, असं केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत भारताच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या ६४ व्या आंतरराष्ट्रीय साखर संघटनेच्या बैठकीत बोलत होते.  ऊसापासून साखर तर त्याच्या कचऱ्यापासून इथेनॉल मिळत असल्यामुळे कमीत कमी पाण्याचा वापर करून ऊसाचं उत्पादन वाढवण्याबाबत संशोधन करण्याचं आवाहन जोशी यांनी उपस्थित तज्ञांना केलं.

June 25, 2024 1:59 PM

views 65

७वी अर्थसंकल्प पूर्व बैठक आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झाली

आगामी अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी ७वी अर्थसंकल्प पूर्व बैठक आज नवी दिल्ली इथं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. विविध व्यापार आणि सेवा पुरवठादार प्रतिनिधींसोबत सीतारामन यांनी सविस्तर चर्चा केली. या बैठकीला केंद्रीय अर्थराज्य मंत्री पंकज चौधरी, मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंता नागेश्वरन, वित्त सचिव टी . व्ही. सोमनाथन तसंच आर्थिक व्यवहार विभागाचे आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे सचिव उपस्थित होते.

June 21, 2024 8:35 PM

views 53

नवी दिल्लीत देशातल्या शेतकरी संघटनांची आणि कृषीअर्थतज्ञांची अर्थसंकल्पपूर्व बैठक

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज नवी दिल्लीत देशातल्या शेतकरी संघटनांची आणि कृषीअर्थतज्ञांची अर्थसंकल्पपूर्व बैठक घेतली. यावेळी अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी, अर्थविभागाचे सचिव टी.व्ही. सोमनाथन, मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंथा नागेश्वरन आदी अधिकारी उपस्थित होते. या आधी अर्थमंत्र्यांनी आर्थिक आणि गुंतवणूक बाजारातील तज्ञांबरोबर अर्थसंकल्पपूर्व बैठक घेतली होती.

June 20, 2024 8:21 PM

views 49

देशाचा विकास दिव्यांगांविषयी बाळगलेल्या संवेदनशीलतेच्या आधारेच गणला जाऊ शकतो – राष्ट्रपती

एखाद्या देशाचा किंवा समाजाचा विकास त्या देशाच्या नागरिकांनी दिव्यांग जनांविषयी बाळगलेल्या संवेदनशीलतेच्या आधारेच गणला जाऊ शकतो, असं मत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्ली इथं मांडलं. त्या पंडित दिनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय दिव्यांग संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात बोलत होत्या. समावेशी वृत्ती हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक असल्याचं मुर्मू यावेळी म्हणाल्या.   मुर्मू यांनी या संस्थेतल्या दिव्यांग मुलांशी संवाद साधला. त्यांनी या संस्थेतल्या नविकृत कृत्रिम अवयव केंद्रालाही भेट दिली. ...