August 13, 2026 8:13 PM

views 25

बांगलादेशच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर बीएनपीचे उमेदवार

बांगलादेशातल्या सत्ताधारी ‘बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीने’ आज पक्षाचे सरचिटणीस मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांना राष्ट्राध्यक्ष पदासाठीचा आपला उमेदवार म्हणून घोषित केलं. ढाका इथं पक्षाचे अध्यक्ष आणि प्रधानमंत्री तारिक रहमान यांच्याबरोबर बीएनपीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाल्यावर या उमेदवारीची घोषणा झाली.   उमेदवारी घोषित झाल्यावर आलमगीर यांनी आज  बीएनपीच्या सरचिटणीसपदाचा आणि पक्षाच्या स्थायी समितीचा राजीनामा दिला. बांगलादेशमध्ये येत्या २० ऑगस्ट रोजी अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे.

August 4, 2026 8:52 PM

views 14

नवी दिल्लीत पुढच्या आठवड्यात होणाऱ्या ब्रिक्स परिषदेसाठी बांगला देशाचे प्रधानमंत्री तारिक रहमान यांना भारताकडून आमंत्रण

भारतानं बांगलादेशचे प्रधानमंत्री तारिक रहमान यांना ब्रिक्स परिषदेसाठी निमंत्रण दिलं आहे. येत्या १२ आणि १३ सप्टेंबरला ब्रिक्सची वार्षिक परिषद नवी दिल्ली इथं होणार आहे. त्याला बिम्सटेक संघटनेचे अध्यक्ष या नात्याने उपस्थित राहावं असं या निमंत्रणात म्हटलं आहे.   परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. ब्रिक्स देशांखेरीज इतरही देशांना यजमान या नात्यानं भारताने आमंत्रण दिलं आहे.

January 11, 2026 1:19 PM

views 73

बांगलादेशात अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांत वाढ

बांगलादेशात अल्पसंख्याकांवर हल्ले वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आणखी एका हिंदू धर्मीय तरुणाला मारहाण करुन जबरदस्तीनं विष प्यायला लावल्याची घटना समोर आली आहे.  सुनामगंजमधे देराई इथं मोबाईल फोनचा हप्ता भरण्यावरुन झालेल्या वादात संबंधित तरुणाचा मृत्यू झाला.  पोलीस तपास सुरु असल्याचं आकाशवाणी वार्ताहरानं कळवलं आहे.

January 10, 2026 12:35 PM

views 92

बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे नेते तारिक रहमान यांची पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे नेते तारिक रहमान यांची पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माजी प्रधानमंत्री आणि प्रदीर्घ काळ पक्षाध्यक्ष राहिलेल्या खालिदा झिया यांच्या निधनामुळे हे पद रिक्त झालं होतं. पक्षाच्या स्थायी समितीच्या काल झालेल्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. पक्षाचे सरचिटणीस मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांनी ही माहिती दिली. तारिक रहमान २०१८ सालापासून पक्षाचे प्रभारी अध्यक्ष म्हणून कार्यरत होते.

January 8, 2026 1:17 PM

views 60

बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीशी संलग्नित संघटनेच्या नेत्याची हत्या

बांगलादेशाची राजधानी ढाका इथं काल रात्री बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीशी संलग्नित संघटनेच्या एका नेत्याची हत्या झाली. अजिजूर रहमान मुसाबीर असं या नेत्याचं नाव आहे. मुसाबीर हे बीएनपीशी संलग्नित स्वेच्छासेबोक दल या संघटनेचे पदाधिकारी होते. कारवान बाजार व्हॅन मालक संघटनेचे पदाधिकारी अबु सुफियान या हल्ल्यात जखमी झाले आहेत. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी ढाक्यामधल्या फाउंटन चौकात निदर्शनं केली.

January 5, 2026 3:42 PM

views 77

आयपीएल स्पर्धेच्या प्रसारणावर बांगलादेशाकडून अनिश्चित काळासाठी बंदी

बांगलादेशनं आगामी आयपीएल स्पर्धेच्या प्रसारणावर अनिश्चित काळासाठी बंदी घातली आहे. कोलकाता नाईट रायडर्समधून बांगलादेशचा जलदगती गोलंदाज मुस्तफिजूर रहमान याला वगळल्यानंतर बांगलादेशनं हा निर्णय घेतला. रहमान याला संघाबाहेर काढायचा निर्णय बीसीसीआयच्या निर्देशांनुसार घेतला असून त्यामागे कोणतंही तार्किक कारण नव्हतं. याचे तीव्र पडसाद बांगलादेशच्या जनतेत उमटत असून त्यामुळे आयपीएलच्या प्रसारणावर बंदी घातल्याचं बांगलादेश सरकारच्या आदेशात म्हटलं आहे.

December 22, 2025 2:38 PM

views 98

‘बांगलादेशात अवामी लीगशिवाय होणारी निवडणूक ही राज्याभिषेक असेल’

बांगलादेशात अवामी लीगशिवाय होणारी निवडणूक ही निवडणूक नसून राज्याभिषेक असेल असं बांगलादेशाच्या पदच्युत प्रधानमंत्री शेख हसीना म्हणाल्या आहेत. एका वृत्त संस्थेला त्या मुलाखत देत होत्या.  मोहम्मद युनुस हे बांगलादेशी नागरिकांच्या पाठिंब्याशिवाय तिथे सत्ता गाजवत असून, आता ते जनतेनं नऊ वेळा निवडून दिलेल्या पक्षावर बंदी घालण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका शेख हसीना यांनी केली. भारत हा बांगलादेशाचा सर्वात घनिष्ट मित्र आणि भागीदार आहे. मात्र, मोहम्मद युनूस हे बांगलादेशात भारताच्या विरोधात लोकभावना भडकवत ...

December 20, 2025 5:31 PM

views 65

बांगलादेशातल्या सर्व घटकांनी संयम बाळगावा-अँटोनियो गुटेरेस

बांगलादेशातल्या सर्व घटकांनी संयम बाळगावा, देशात उसळलेला तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करावा आणि हिंसाचारापासून दूर रहावं, असं आवाहन संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी केलं आहे. युवा नेते शरीफ उस्मान बिन हादी यांच्या हत्येचा निषेध करत, गुटेरेस यांनी बांग्लादेशी अधिकाऱ्यांना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार मानकांनुसार या हत्येची त्वरित आणि निष्पक्ष चौकशी करण्याचं आवाहन देखील केलं आहे.  दरम्यान, देशात फेब्रुवारी मध्ये संसदीय निवडणुका होणार असून त्यापार्श्वभूमीवर हादीच्या मृत्यूनंतर देशभर...

December 20, 2025 1:11 PM

views 56

Bangladesh: कडेकोट बंदोबस्तात विद्यार्थी नेता शरीफ ओस्मान हैदीवर अंत्यसंस्कार

बांग्लादेश सरकार कडेकोट बंदोबस्तात विद्यार्थी नेता शरीफ ओस्मान हैदीवर अंत्यसंस्कार करणार आहे. संसदेच्या इमारतीत दुपारी अंतिम नमाज अदा केली जाईल, असं सरकारनं कळवलं आहे. त्याच्या निधनानिमित्त सरकारनं एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. इन्किलाब मंच या संघटनेचा प्रवक्ता असलेल्या हैदीवर १२ तारखेला ढाक्यात गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. उपचारादरम्यान सिंगापूरमध्ये त्यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं. त्यानंतर बांग्लादेशमध्ये हिंसाचार उफाळून आला होता. प्रधानमंत्री शेख हसीना यांचं सरकार उलथवून टाकण्य...

December 19, 2025 8:23 PM

views 80

बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचाराचा प्रतिकार करण्याचं हंगामी सरकारचं आवाहन

बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचाराचा प्रतिकार करण्याचं आवाहन तिथल्या हंगामी सरकारनं नागरिकांना केलं आहे. बांगलादेशात जुलैमधे झालेल्या बंडाचा एक प्रमुख नेता शरीफ ओस्मान हादी हा काही दिवसांपूर्वी गोळीबारात जखमी झाला. सिंगापूरमधे उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह ढाक्यात पोचल्यावर काल रात्री विविध भागात तोडफोड आणि हल्ले सुरु झाले. चत्तोग्राममधे भारताच्या सहायक उच्चायुक्तांच्या घरावरही दगडफेक झाली. आज मात्र कुठंही नव्यानं हिंसाचार घडल्याचं वृत्त नाही.