राज्यातल्या SIR प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून आणखी मुदतवाढ

केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या SIR अर्थात मतदार याद्याच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला दुसऱ्यांना मुदतवाढ दिली आहे. आता गृहभेटी ८ ऑगस्टऐवजी १७ ऑगस्टपर्यंत करता येतील. प्रारुप मतदार यादी १७ ऐवजी २४ ऑगस्टला प्रकाशित होईल.

 

त्यावरच्या हरकती २३ सप्टेंबर पर्यंत दाखल करता येतील आणि त्यावरचे आक्षेप, दावे २२ ऑक्टोबरपर्यंत निकाली काढले जातील. त्यानंतर २७ ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रकाशित होईल. पूर्वी ही यादी १९ ऑक्टोबरला प्रकाशित होणार होती.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.