August 5, 2026 11:21 AM

printer

भुवनेश्वरमध्ये आजपासून ‘ब्रिक्स’ शिक्षण मंत्र्यांची बैठक

‘ब्रिक्स’ शिक्षण मंत्र्यांची बैठक आणि 3 री ‘ब्रिक्स’ वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आजपासून भुवनेश्वर इथं होत आहे. या महिन्याच्या सात तारखेपर्यंत ही बैठक चालणार असून, यात ‘ब्रिक्स’ सदस्य देशांचे शिक्षण मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिनिधी एकत्र येणार आहेत, अशी माहिती शिक्षण मंत्रालयानं दिली आहे. 

या बैठकीत बालपणातील संगोपन आणि शिक्षण बळकट करणं, कौशल्य विकास, नाविन्यपूर्ण उपक्रम (इनोव्हेशन) आणि स्टार्ट-अप्सना प्रोत्साहन देणं आदी विषयावर चर्चा होणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी या बैठकीत सहभागी होणार आहेत.