दक्षिण कोरियातील आसन इथं कोरिया मास्टर्स सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेला आजापसून सुरुवात होत आहे. तैपेई खुल्या महिला एकेरी स्पर्धेचं अजिंक्यपद मिळवणारी तन्वी शर्मा आणि किदाम्बी श्रीकांत यांच्यासह आघाडीचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत आहेत.
भारताकडून या स्पर्धेत पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी अशा विविध प्रकारांत ३३ क्रिडापटू आपलं कसब आजमावणार आहेत.