उत्तर प्रदेश सरकार 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून मोफत प्रवासाची सुविधा देणार आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो ज्येष्ठ महिलांना आर्थिक दिलासा मिळेल आणि त्यांना धार्मिक, सामाजिक, कौटुंबिक तसेच आरोग्यविषयक गरजांसाठी प्रवास करणे शक्य होईल, असं सरकारनं म्हटलं आहे.
याव्यतिरिक्त, सरकारनं महिला कल्याण विभागासाठी अतिरिक्त एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामुळं महिला आणि बालकांच्या संरक्षणाशी संबंधित महत्त्वाच्या योजना अधिक बळकट होतील, असा विश्वास सरकारनं व्यक्त केला आहे.