प्रादेशिक बातम्या

August 5, 2026 3:52 PM

views 31

होमिओपॅथ डॉक्टरांना मान्यता देण्यासंदर्भात आंदोलन तीव्र करण्याचा मार्ड संघटनेचा इशारा

बीएचएमएस डॉक्टर्सना ॲलोपॅथिक औषधं लिहून देण्यास मान्यता देण्याला  विरोध आणि इतर मागण्यांसाठी मार्ड या राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या  संघटनेनं  अपघात आणि आपत्कालीन सेवा वगळता इतर विभागातलं काम बंद ठेवलं आहे. सरकारनं चर्चेसाठी पुढाकार घेतला नाही तर २४ तासांनंतर आपत्कालीन सेवा देखील बंद करण्यात येतील...

August 5, 2026 4:05 PM

views 30

ई20 इंधन धोरणावरील मजकूरप्रकरणी नितीन गडकरींना हायकोर्टाचा दिलासा

 इथेनॉल मिश्रित ई ट्वेंटी इंधन धोरणाशी संबंधित केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याबाबत प्रसारित झालेला समाज माध्यमांवरचे आक्षेपार्ह मजकूर तातडीनं हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. इथेनॉल मिश्रित इंधन वापरात गडकरी यांचा आर्थिक फायदा असल्याचा दावा करणारे मजकूर समाज माध्यमावर प्रसारित झा...

August 4, 2026 8:03 PM

views 32

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधे रिक्षाच्या प्रवास भाड्यात १ सप्टेंबरपासूनवाढ

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधे रिक्षाच्या प्रवास भाड्यात वाढ करायला प्रादेशिक परिवहन प्राधिकरणानं मंजुरी दिली आहे. नव्या दरानुसार, पहिल्या दीड किलोमीटरसाठीचं किमान भाडे २५ रुपयांवरून ३० रुपये केलं आहे. तर, त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी आकारलं जाणारं भाडं १७ रुपयांवरून २० रुपये केलं आहे.   १ सप्...

August 4, 2026 8:01 PM

views 37

आळंदी पोलिसांकडून आंतरराज्य सायबर टोळीतील मुख्य म्यूल अकाउंट पुरवठादाराला अटक

ऑनलाइन गुंतवणूक आणि इतर आमिषं दाखवून देशातल्या ६५ नागरिकांची सुमारे १५० कोटीची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य सायबर टोळीतल्या मुख्य म्यूल अकाउंट पुरवठादाराला आळंदी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या ९ खात्यांमध्ये १ कोटी १५ लाख रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचं तपासात उघड झालं आहे.   आळंदीत एका बँके...

August 4, 2026 7:51 PM

views 27

राज्यात दत्तक प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश

राज्यात दत्तक प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयानं प्रलंबित प्रकरणं तातडीनं निकाली काढावीत, असे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत. मंत्रालयात दत्तक प्रक्रिया संदर्भात आढावा बैठक झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. राज्यात सध्या ६२ विशेष ...

August 4, 2026 7:38 PM

views 27

पीओपी मूर्तींवर यंदा बंदी नाही, परंतु टप्प्याटप्प्यानं बंदीचा सरकारचा निर्णय

पीओपी अर्थात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर यंदा बंदी घालता येणं शक्य नाही परंतु टप्प्याटप्प्यानं त्या बंद करू, असं आश्वासन राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात दिलं आहे. त्याचवेळी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या ६ फुटांपेक्षा जास्त उंचीच्या गणेश मूर्तींचं विसर्जन समुद्रात करण्याची परवानगी यंदाही द्यावी अशी व...

August 4, 2026 6:25 PM

views 25

बीएचएमएस डॉक्टरांच्या मान्यतेविरोधात मुंबई महापालिका रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा उद्यापासून बाह्यरुग्णसेवा बंदचा इशारा

बीएचएमएस डॉक्टर्सना मान्यतेच्या निषेधात आणि इतर मागण्यांसाठी मुंबई महानगरपालिका रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांनी उद्यापासून बाह्य रुग्णसेवा बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. होमिओपॅथीचा सीसीएमपी प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या बीएचएमएस डॉक्टर्सना महाराष्ट्र मेडीकल काऊन्सिलमधे नोंदणी करण्याची परवानग...

August 4, 2026 8:13 PM

views 106

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला तीन वर्षांची मुदतवाढ

 गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला राज्य सरकारनं आणखी तीन वर्षाची मुदतवाढ दिली आहे. यात अपघातात मृत्यू किंवा जखमी झालेल्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. या योजनेत भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश करायला राज्य मंत्रीमंडळानं आज झालेल्या बैठकी...

August 4, 2026 3:30 PM

views 20

राज्यातले माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर ६ महिन्यात निर्णय

राज्यातले माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर ६ महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहे. कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगितीही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सुर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि व्ही. मोहना यांच्या खंडपीठानं कायम ठेवली. ९० च्या द...

August 4, 2026 1:35 PM

views 49

महाराष्ट्रात व्यसनमुक्तीविषयीचे धडे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी प्रक्रिया सुरु करावी असे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

महाराष्ट्रात व्यसनमुक्तीविषयीचे धडे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी प्रक्रिया सुरु करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक झाली. शाळांची सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसंच विद्यार्थ्यांचं सायबर...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.