बीएचएमएस डॉक्टर्सना मान्यतेच्या निषेधात आणि इतर मागण्यांसाठी मुंबई महानगरपालिका रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांनी उद्यापासून बाह्य रुग्णसेवा बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. होमिओपॅथीचा सीसीएमपी प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या बीएचएमएस डॉक्टर्सना महाराष्ट्र मेडीकल काऊन्सिलमधे नोंदणी करण्याची परवानगी देणारा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.
मात्र या निर्णयामुळे रुग्णांची सुरक्षितता धोक्यात येईल, असं ॲलोपथी वैद्यकशाखेतल्या डॉक्टरांचं म्हणणं आहे. सर्व मान्यताप्राप्त वैद्यकीय ज्ञानशाखांविषयी संघटनेला आदर आहे, मात्र हा प्रश्न न्यायप्रविष्ट असून उच्च न्यायालयाचा अंतिम निवाडा येईपर्यंत शासनाने याबाबत निर्णय घेऊ नये अशी मार्डची मागणी आहे.
याशिवाय वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा, आणि इतर प्रलंबित मागण्यांही मार्डनं लावून धरल्या आहेत.