August 4, 2026 6:25 PM

views 35

बीएचएमएस डॉक्टरांच्या मान्यतेविरोधात मुंबई महापालिका रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा उद्यापासून बाह्यरुग्णसेवा बंदचा इशारा

बीएचएमएस डॉक्टर्सना मान्यतेच्या निषेधात आणि इतर मागण्यांसाठी मुंबई महानगरपालिका रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांनी उद्यापासून बाह्य रुग्णसेवा बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. होमिओपॅथीचा सीसीएमपी प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या बीएचएमएस डॉक्टर्सना महाराष्ट्र मेडीकल काऊन्सिलमधे नोंदणी करण्याची परवानगी देणारा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.   मात्र या निर्णयामुळे रुग्णांची सुरक्षितता धोक्यात येईल, असं ॲलोपथी वैद्यकशाखेतल्या डॉक्टरांचं म्हणणं आहे. सर्व मान्यताप्राप्त वैद्यकीय ज्ञानशाखांविषयी...