August 6, 2026 3:27 PM

views 67

दोन दिवसीय ब्रिक्स वेव्हज बाजार परिषदेला आजपासून मुंबईत सुरुवात

 मनोरंजन क्षेत्रात व्यवसायसुलभता येण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळं या क्षेत्रात गुंतवणूक आणि वृद्धीसाठी पोषक वातावरण निर्मिती होत असल्याचं प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केलं आहे.   मुंबईत सुरू झालेल्या २ दिवसीय ब्रिक्स वेव्हज बाजार परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. तरुण वर्गाला अधिकाधिक संधी देऊन त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.         यंदा इफ्फीसोबतच ब्रिक्स चित्रपट महोत...

August 4, 2026 6:25 PM

views 35

बीएचएमएस डॉक्टरांच्या मान्यतेविरोधात मुंबई महापालिका रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा उद्यापासून बाह्यरुग्णसेवा बंदचा इशारा

बीएचएमएस डॉक्टर्सना मान्यतेच्या निषेधात आणि इतर मागण्यांसाठी मुंबई महानगरपालिका रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांनी उद्यापासून बाह्य रुग्णसेवा बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. होमिओपॅथीचा सीसीएमपी प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या बीएचएमएस डॉक्टर्सना महाराष्ट्र मेडीकल काऊन्सिलमधे नोंदणी करण्याची परवानगी देणारा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.   मात्र या निर्णयामुळे रुग्णांची सुरक्षितता धोक्यात येईल, असं ॲलोपथी वैद्यकशाखेतल्या डॉक्टरांचं म्हणणं आहे. सर्व मान्यताप्राप्त वैद्यकीय ज्ञानशाखांविषयी...

January 1, 2026 3:33 PM

views 311

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी २ हजार ३४९ उमेदवारी अर्ज वैध

महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची काल छाननी झाली. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी २ हजार ५१६ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. राज्य निवडणूक आयोगाने केलेल्या छाननीत त्यातले १६७ अर्ज अवैध ठरले. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ९४६ अर्ज दाखल झाले. या अर्जांच्या छाननीनंतर ११७ अर्ज अवैध ठरले तर ८३९ अर्ज वैध ठरले.   सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी एकूण १ हजार ४६० अर्ज दाखल झाले होते. छाननीत या अर्जांपैकी २३० अर्ज अवैध ठरले असून १...

December 26, 2025 7:27 PM

views 111

मोठ्या शहरांमधून सुटणाऱ्या रेल्वेगाड्यांची क्षमता दुप्पट होणार

येत्या ५ वर्षात मुंबईसह एकूण ४८ मोठ्या शहरांमधून सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांची प्रवासी क्षमता दुप्पट करण्याचं रेल्वेचं नियोजन आहे. उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या, अशा दोन्ही गाड्यांच्या प्रवासी क्षमतेत ही वाढ होणार आहे. त्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना रेल्वे मंडळाचे अध्यक्ष सतीश कुमार यांनी सर्व विभागीय रेल्वे कार्यालयांना दिल्या आहेत. त्यासाठी शहरी भागात नवीन टर्मिनलची उभारणी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.

December 17, 2025 2:35 PM

views 112

मुंबईत पहिलं जेन झी टपाल कार्यालय सुरू होणार

अद्ययावत सुविधा देणारं महाराष्ट्रातलं पहिलं जेन झी टपाल कार्यालय मुंबईत सुरू होत असून आयआयटी मुंबई परिसरात उद्या या कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे.   जेन झी अर्थात तरुण पिढीला टपाल सेवेकडे आकर्षित करण्यासाठी जेन झी टपाल कार्यालयाची संकल्पना देशभरात राबवली जात आहे. दिल्ली, केरळ, बिहार, गुजरात आणि आंध्रप्रदेशात हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता मुंबईत जेन झी टपाल कार्यालय सुरू होत आहे. मोफत वाय-फाय  सुविधा, कॅफेटेरिया, वाचनालय, संगीत कक्ष या सुविधांनी सुसज्ज असलेल्या या कार्यालयात पूर्णपणे डिजिट...

December 11, 2025 7:05 PM

views 100

ओसी प्रलंबित असलेल्या मुंबईतल्या इमारतींसाठी राज्य सरकारकडून अभय योजना जाहीर

मुंबईतल्या सुमारे २० हजार इमारतींना नियमित करण्यासाठी 'सुधारीत भोगवटा अभय योजना' लागू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. गेली अनेक वर्ष ओसी, म्हणजेच भोगवटापत्रापासून वंचित असलेल्या दहा लाखांपेक्षा जास्त मुंबईकरांना यामुळे दिलासा मिळणार आहे.   या योजनेमुळे या इमारतींना आता दुप्पट मालमत्ता कर भरावा लागणार नाही, घरांच्या खरेदी-विक्रीसाठी बँकांकडून सहज कर्ज मिळेल, घरांना योग्य किंमत मिळेल, आणि पुनर्विकासात या इमारतींना त्यांच्या संपूर्ण क्षेत्राचा लाभ घेता येईल. त...

December 4, 2025 7:16 PM

views 101

नागरिकांची पत्र, पार्सल जलद पोहोचणार…

भारतीय डाक विभागानं नागरिकांची पत्रं आणि पार्सल जलद गतीने पोहोचवण्यासाठी आपल्या ताफ्यात २११ इलेक्ट्रिक दुचाकींचा समावेश केला आहे. आज मुंबईच्या चकाला इथल्या पोस्ट ऑफिसमध्ये या सेवेचा आरंभ करण्यात आला.  या इलेक्ट्रिक दुचाकींंच्या माध्यमातून जीपीओ, चकाला, शीव, दादर आणि काळबादेवी इथल्या पोस्ट ऑफिसमधून या भागातली सर्व प्रकारची पत्रं आणि पार्सल पोहोचवण्यात येणार आहेत.  

November 29, 2025 6:06 PM

views 75

मुंबईतल्या वायू प्रदूषणाचा सामना करण्यात राज्य सरकार अपयशी – वर्षा गायकवाड

मुंबईतल्या वायू प्रदूषणाच्या वाढत्या आव्हानाचा सामना करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याची टीका काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केली  आहे. त्या मुंबईत हवेच्या गुणवत्ता विषयावर काँग्रेसकडून आयोजित बैठकीत आज बोलत होत्या. दूषित हवेमुळे दरवर्षी मुंबईतले ५ हजार शंभर लोक आपले प्राण गमावतात असं गायकवाड यांनी हावर्ड विद्यापीठाच्या अभ्यासाचा हवाला देऊन सांगितलं.  बेसुमार बांधकाम, वृक्षतोड, पर्यावरणीय नियमांचं उल्लंघन यामुळे वायू प्रदूषणात भर पडत आहे. मात्र महायुती सरकार केवळ कंत्राटदारांच्या फायद्याची ध...

November 26, 2025 7:25 PM

views 86

मुंबईची हवा ‘खराब’ श्रेणीत

मुंबईत आज संध्याकाळी हवेचा गुणवत्ता निर्देशांक २२४ इतका नोंदवण्यात आला. हा आकडा अतिशय खराब या श्रेणीत मोडतो. इथियोपियातल्या ज्वालामुखीचा उद्रेक हे यामागचं कारण असू शकतं, शिवाय, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात गुणवत्ता निर्देशांक सामान्यतः घसरलेला असतो.    गेल्या २४ तासात राज्यातल्या काही भागात तपमान घसरलं. येत्या १-२ दिवसात राज्यभरात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज आहे. दक्षिणेकडच्या राज्यात वेगवान वारे वाहण्याची शक्यता असल्यानं रविवारपर्यंत खोल समुद्रात मासेमारी टाळण्याचं आवाहन हवामा...

November 26, 2025 7:12 PM

views 93

IITच्या नावातून बॉम्बे काढून मुंबई टाकण्यासाठी प्रधानमंत्र्यांना पत्र लिहिण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबईतल्या आयआयटीच्या नावातून बॉम्बेचं काढून मुंबई आणावं यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहून मागणी करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज नागपुरात वार्ताहरांशी बोलताना दिली.    केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी आयआयटीच्या नावात बॉम्बे असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं होतं. त्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली होती. याप्रकरणावरुन ते बोलत होते.