November 24, 2025 7:04 PM

views 94

माहे युद्धनौका मुंबईत नौदलाच्या ताफ्यात दाखल

माहे ही युद्धनौका आज मुंबई इथं नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. माहे श्रेणीतली ही पहिली पाणबुडीविरोधी उथळ पाण्यातली युद्धनौका कोचीच्या जहाजबांधणी गोदीत तयार झाली असून यात ८० टक्क्यापेक्षा जास्त सामग्री स्वदेशी बनावटीची आहे. मलबार किनारपट्टीवरच्या माहे या ऐतिहासिक गावावरून हिचं नाव ठेवण्यात आलं आहे. या युद्धनौकेचं प्रतीक असलेली उरुमी ही तलवार, कलरीपयट्टू या युद्धकलेचा महत्त्वाचा भाग आहे.युद्धनौकेच्या दाखल झाल्यानिमित्त आयोजित सोहळ्यात व्हाईस ऍडमिरल कृष्णा स्वामिनाथन, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी...

November 17, 2025 6:22 PM

views 89

रायगडमध्ये उभारण्यात येत असलेल्या तिसऱ्या मुंबईला भूमीपुत्रांचा विरोध

रायगड जिल्हात उभारण्यात येत असलेल्या तिसऱ्या मुंबईला स्थानिक आणि भूमीपूत्र तीव्र विरोध करत आहेत. या योजने अंतर्गत  धेरंड - शहापूर परिसरात सुमारे ३८७ हेक्टर क्षेत्रात उभारल्या जाणाऱ्या सिनारमास कंपनीच्या प्रकल्पाचं सीमांकन आणि तिथवर जाणाऱ्या रस्त्याच्या भराव कामाला सुरुवात झाली. यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी आज जोरदार निदर्शनं  केली. आधी आपल्या मागण्यांवर चर्चा व्हावी अशी मागणी करत शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

November 12, 2025 2:44 PM

views 88

मुंबईत सेप्टिक टँकमध्ये गुदमरून एका कामगाराचा मृत्यू

मुंबईत पवई इथे सेप्टिक टँकमध्ये गुदमरून एका कामगाराचा मृत्यू झाला असून अन्य एक कामगार अत्यवस्थ आहे. पवई इथल्या सांडपाणी प्रकल्पातल्या सेप्टिक टँकमध्ये हे दोन कामगार सफाईसाठी उतरले होते. मात्र, सेप्टिक टँकमधल्या गॅसमुळे त्यांना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यापैकी एका कामगाराचा मृत्यू झाला असून दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत.

November 1, 2025 6:57 PM

views 209

मतदार याद्यांतील त्रुटी दूर करण्याच्या मागणीसाठी मविआचा मोर्चा

मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीनं आज मुंबईत ‘सत्याचा मोर्चा’ काढला आहे. या मोर्चात जेष्ठ नेते शरद पवार यांच्यासह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, माकपचे राज्य सचिव डॉ अजित नवले, भापकचे सुभाष लांडे सहभागी झाले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर लोकांच्या मनात संसदीय लोकशाहीबद्दल अविश्वास निर्माण झाला असून सत्तेचा सातत्याने गैरवापर केला जात आहे, असा आरोप ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला....

October 28, 2025 3:17 PM

views 106

इंडिया मेरीटाईम वीक परिषदेला प्रधानमंत्री उद्या संबोधित करणार

मुंबईमध्ये सुरु असलेल्या इंडिया मेरीटाईम वीक परिषदेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या संबोधित करणार आहेत. यावर्षीच्या इंडिया मेरिटाईम परिषदेत जागतिक स्तरावरील नील अर्थव्यवस्थेत काम करणाऱ्या उद्योगांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बैठकीच्या अध्यक्षपदावरुन ते उपस्थितांशी संवाद साधतील.   सागरी अमृत काल व्हिजन २०४७ या पंतप्रधानांच्या संकल्पनेला चालना देण्याच्या उद्देशाने महत्त्वाकांक्षी, भविष्याभिमुख सागरी परिवर्तनासाठीची वचनबद्धता दर्शवणारा हा उपक्रम आहे. यामध्ये जलवाहतूक, बंदरे, जहाजबांधणी, क्रूझ पर्...

October 25, 2025 8:20 PM

views 77

मुंबईचा AQI हवेचा दर्जा दर्शवणारा निर्देशांक सुधारला

मुंबईचा AQI अर्थात हवेचा दर्जा दर्शवणारा निर्देशांक सुधारला आहे. दिवाळीत हा निर्देशांक झपाट्याने खालावला होता. दोन दिवस काही ठिकाणी पडलेल्या तुरळक पावसाने धुरके खाली बसून निर्देशांकात सुधार व्हायला मदत झाली.  बहुतांशी ठिकाणी हा निर्देशांक मध्यम श्रेणीत पोचला.   सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे भातशेतीचं  नुकसान झालं आहे. अरबी समुद्रात वादळी परिस्थती निर्माण झाल्यामुळे बंदरांमध्ये धोक्याचा तीन नंबरचा बावटा लावण्यात आला आहे. मच्छिमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी ज...

October 18, 2025 11:25 AM

views 82

डिजिटल अटकेचा बहाणा करून व्यावसायिकाचे ५८ कोटी रुपये लुटणाऱ्या 3 आरोपींना अटक

डिजिटल अटकेचा बहाणा करून मुंबईतल्या एका व्यावसायिकाचे ५८कोटी रुपये लुटणाऱ्या 3 आरोपींना महाराष्ट्र सायबर पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं 'डिजिटल अटक' या सायबर गुन्ह्याबाबत गंभीर दखल घेत केंद्रीय अन्वेषण संस्थेकडून उत्तर मागितलं आहे. हरयाणातल्या अंबाला इथल्या एका ज्येष्ठ नागरिक महिलेच्या तक्रारीनंतर सर्वोच्च न्यायालयाने ही दखल घेतली आहे.

October 15, 2025 7:18 PM

views 85

दिल्ली आणि मुंबईच्या हवेत प्रदूषणकारी वायूंच्या पातळीत वाढ

दिल्ली आणि मुंबईच्या हवेतली कार्बन डायॉक्साईड आणि मिथेन या प्रदूषणकारी वायूंची पातळी गेले अनेक वर्षं वाढत असल्याचं आयआयटी मुंबईच्या संशोधकांच्या अहवालात दिसून आलं आहे.    दिल्लीच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक काल २११ पर्यंत अर्थात ‘वाईट’ या श्रेणीत पोचला असून येत्या शुक्रवारपर्यंत तो ३४६ पर्यंत म्हणजेच ‘अतिशय वाईट’ या श्रेणीत पोचण्याची शक्यता आहे. मुंबईच्या हवेचा सरासरी गुणवत्ता निर्देशांक पावसाळा थांबल्यानंतरच्या काळात अधिक खराब झाला असून तो गेल्या आठवड्यात १५३ पर्यंत पोचला असल्याचं या अहवा...

October 8, 2025 7:14 PM

views 90

ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांची मुंबईत विविध उद्योजकांशी चर्चा

ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून आज मुंबईत त्यांनी आणि त्यांच्यासोबतच्या व्यापारी शिष्टमंडळानं आज मुंबईत देशातल्या विविध उद्योजकांची भेट घेतली.   भारत आणि ब्रिटन मुक्त व्यापार करार हा युरोपियन महासंघातून बाहेर पडल्यानंतर ब्रिटनने स्वाक्षरी केलेला सर्वात मोठा करार असल्याचं ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर आज मुंबईत उद्योजकांना संबोधित करताना म्हणाले.  स्टार्मर यांनी आज यशराज फिल्म्स स्टुडिओलाही आज भेट दिली. पुढच्या वर्षी यशराज फिल्म्सच्या ३ चित्र...

October 8, 2025 7:29 PM

views 201

नवी मुंबई विमानतळ, मेट्रो ३ चा अखेरचा टप्पा, आणि मुंबई १ ॲपचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

लोकांचं आयुष्य सुकर करण्यासाठी सरकार पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असल्याची माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दिली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई मेट्रो ३ चा आचार्य अत्रे चौक ते कफ परेड दरम्यानचा अखेरचा टप्पा, तिकिट काढण्यासाठीचं मुंबई वन हे ॲप आणि आयटीआयमधल्या अल्पकालीन अभ्यासक्रमांचा प्रारंभ प्रधानमंत्र्यांनी आज नवी मुंबईतून केला.   ८ वर्षांपूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भूमीपूजन केलेल्या नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन आज त्यांच्याच हस्ते झालं. डिसे...