राज्यातले माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर ६ महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहे. कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगितीही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सुर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि व्ही. मोहना यांच्या खंडपीठानं कायम ठेवली. ९० च्या दशकात खोटे उत्पन्न दाखवून एक घर लाटल्याच्या आरोपावरुन नाशिकमधल्या न्यायालयांना त्यांना २ वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानं या शिक्षेला स्थगिती दिली आहे.
News On AIR | August 4, 2026 3:30 PM | Decision | Manikrao Kokate
राज्यातले माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर ६ महिन्यात निर्णय