आळंदी पोलिसांकडून आंतरराज्य सायबर टोळीतील मुख्य म्यूल अकाउंट पुरवठादाराला अटक

ऑनलाइन गुंतवणूक आणि इतर आमिषं दाखवून देशातल्या ६५ नागरिकांची सुमारे १५० कोटीची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य सायबर टोळीतल्या मुख्य म्यूल अकाउंट पुरवठादाराला आळंदी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या ९ खात्यांमध्ये १ कोटी १५ लाख रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचं तपासात उघड झालं आहे.

 

आळंदीत एका बँकेतल्या बचत खात्याचा उपयोग ऑनलाइन फसवणुकीतून आलेली रक्कम स्वीकारण्यासाठी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यावरून पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले आणि त्याला अटक केली.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.