प्रादेशिक बातम्या

January 24, 2026 7:25 PM

views 177

चंद्रपूर आणि लातूरमध्ये काँग्रेसचा महापौर होईल – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

चंद्रपूर आणि लातूर महानगरपालिकेत सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू असून दोन्ही ठिकाणी काँग्रेसचा महापौर होईल, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला. चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेस पक्षात कोणतेही मतभेद नाहीत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, वंचित बहुजन आघाडी आणि इतर मि...

January 24, 2026 7:15 PM

views 206

विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपला काहीही संबंध नाही -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपला काहीही संबंध नसून साहित्य क्षेत्राबाहेरील व्यक्तिंनी साहित्य क्षेत्रात हस्तक्षेप करू नये हेच आपलं मत आहे, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गडकरी हस्तक्षेप करत असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर त्यां...

January 24, 2026 7:08 PM

views 174

शालेय विद्यार्थ्यांसाठी मानाचे पाचवे वीर गाथा पुरस्कार प्रदान

शालेय विद्यार्थ्यांसाठी मानाचे पाचवे वीर गाथा पुरस्कार आज प्रदान करण्यात आले. यावर्षीच्या पुरस्कारप्राप्त विदयार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातल्या १९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. १८ देशांमधल्या ९१ शाळांमधून विजेत्यांची निवड करण्यात आली. यावर्षी १ लाख ९२ हजार शाळांमधून सुमारे १ कोटी ९२ लाख उपक्रमात भाग घेतल...

January 24, 2026 6:57 PM

views 142

बदलापूर इथं शिशुवर्गातल्या विद्यार्थिनीशी गैरवर्तणूक केल्याप्रकरणी चालक आणि शाळेच्या वाहनावर कारवाई

शिशुवर्गांवर सरकारचं नियंत्रण आणण्याबाबत सरकार गांभीर्यानं विचार करत असून यासंदर्भातल्या कायद्याचा मसुदा अभ्यास गट तयार करत आहे, अशी माहिती शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना दिली. बदलापूर इथं शिशुवर्गातल्या विद्यार्थिनीशी गैरवर्तणूक केल्याप्रकरणी चालक आणि श...

January 24, 2026 5:22 PM

views 137

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या साडेतीनशेव्या शहीदी वर्षानिमित्त नांदेड इथं शहीदी सत्संग सोहळ्याचं आयोजन

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या साडेतीनशेव्या शहीदी वर्षानिमित्त आज आणि उद्या महाराष्ट्रात नांदेड इथं शहीदी सत्संग सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. सोहळ्याचा प्रारंभ श्री गुरु ग्रंथ साहिब नगर कीर्तनाने झाला. नगर कीर्तन जात असलेल्या मार्गावर नागरिकांनी रांगोळी तसंच फुलांची सजावट केली होती. देश-व...

January 24, 2026 3:54 PM

views 141

मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय कुरिअर टर्मिनलवर २ कोटी ८९ लाख रूपये किमतीचं सोनं जप्त

महसूल गुप्तचर संचलनालयानं आज मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय कुरिअर टर्मिनलवर सौदी अरेबियातून अवैधरित्या आणलेलं सुमारे २ कोटी ८९ लाख रूपये किमतीचं सोनं जप्त केलं. दीड किलोहून अधिक वजनाचं हे सोनं एका यंत्रात लपवलेलं होतं, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. हे पार्सल ...

January 24, 2026 3:50 PM

views 140

गवळी समाजाचे नेते किसनराव हुंडीवाले यांच्या हत्येप्रकरणी १० आरोपींना जन्मठेप

गवळी समाजाचे नेते किसनराव हुंडीवाले यांच्या हत्येप्रकरणी १० आरोपींना जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने दिली आहे.यातले २ जण सध्या न्यायालयीन कोठडीत असून इतर ८ आरोपींना अटक करण्याती प्रक्रीया सुरु असल्याचं पोलीसांनी सांगितलं. २०१९ मधे अकोला शहरातल्या धर्मादाय आयुक्त कार्यालयात हुंडीवाले यांची हत्या झाली ह...

January 24, 2026 2:50 PM

views 80

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या शहीदी वर्षानिमित्त नांदेड इथं शहीदी सत्संग सोहळ्याचं आयोजन

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या साडेतीनशेव्या शहीदी वर्षानिमित्त आज आणि उद्या महाराष्ट्रात नांदेड इथं शहीदी सत्संग सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह देशातल्या अनेक राज्यांचे मुख्यमंत्री तसंच अनेक मान्यवर या सोहळ्यासाठी नांदेड इथं येणार आहेत. या अनुषंगाने आज ...

January 23, 2026 7:54 PM

views 150

दावोसमध्ये यंदा राज्याचे ३७ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार-उदय सामंत

दावोसमध्ये झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेच्या बैठकीतून राज्यात ३७ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले आहेत. त्यातून ४० ते ४२ लाख रोजगारांची निर्मिती होईल, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत दिली.    दावोसमध्ये एकूण ५१ करार झाले असून, त्यापैकी साडे १६ लाख कोटी रु...

January 23, 2026 7:31 PM

views 102

महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ PMLA न्यायालयाकडून दोषमुक्त

नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन कथित घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांना मुंबईतल्या PMLA न्यायालयानं आज दोषमुक्त केलं. नवी दिल्लीत महाराष्ट्र सदन बांधण्यासाठी काढलेला मूळचा खर्चाचा अंदाज नंतर सुमारे चौपट वाढवल्याचा, आणि संबंधित कंत्राटदाराकडून लाच घेतल्याचा आरोप इडी, अर्थात ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.