प्रादेशिक बातम्या

January 23, 2026 6:07 PM

views 179

बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध कल्याणकारी योजना राबवणार – उपमुख्यमंत्री शिंदे

शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज्यात विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त आज मुंबईत आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. घरोघरी आरोग्य तपासणीची सुविधा देणारी आरोग्य आपल्या दारी म...

January 23, 2026 1:26 PM

views 111

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय परिदृश्याला आकार देणाऱ्या बाळासाहेबांचं जनतेशी अनोखं नातं होतं, विविध मुद्द्यांवर ते आपली मतं निडरपणे व्यक्त करत असत, असं प्रधानमंत्र्यां...

January 23, 2026 12:51 PM

views 181

सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन वैयक्तिक पुरस्कार जाहीर

केंद्रसरकारतर्फे देण्यात येणाऱ्या सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन वैयक्तिक पुरस्कारासाठी यंदा लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके यांची निवड झाली आहे. केरळमधे वायनाड इथं २०२४ मधे भूस्खलनामुळे ओढवलेल्या आपत्तीत शेळके यांनी अभियांत्रिकी कौशल्याच्या सहाय्याने बचाव कार्यात लक्षणीय योगदान दिलं होतं. मूळच्या अहिल्...

January 22, 2026 8:34 PM

views 179

यंदाच्या प्रजासत्ताक दिन संचलनात गणेशोत्सवावर आधारित महाराष्ट्राचा चित्ररथ

यंदा प्रजासत्ताक दिनी गणेशोत्सवावर आधारित राज्याचा चित्ररथ कर्तव्यपथावरच्या संचलनात सहभागी होणार आहे. ‘आत्मनिर्भरतेचे प्रतीक - गणेशोत्सव’ अशी या चित्ररथाची संकल्पना आहे. ढोल वाजवणारी महिला, गणपती साकारणारा मुर्तीकार, विसर्जनासाठी निघालेले गणेशभक्त आणि अष्टविनायक मंदिराची प्रतिकृती या चित्ररथात आहे. ...

January 22, 2026 8:06 PM

views 94

संग्राम पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयानं मुंबई पोलिसांना नोटीस बजावली

कथित आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी गुन्हा दाखल झालेले ब्रिटनचे नागरिक यूट्यूबर डॉक्टर संग्राम पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने आज मुंबई पोलिसांना नोटीस बजावली आहे. पोलिसांनी याचिकेला उत्तर द्यावं असं न्यायालयाने सांगितलं. याप्रकरणी पुढील सुनावणी ४ फेब्रुवारीला होणा...

January 22, 2026 7:20 PM

views 103

दावोसमध्ये यंदा राज्याचे ३० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार

दावोस दौऱ्याच्या माध्यमातून राज्यात ३० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आली असून आणखी ७ ते १० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दूरस्थ पद्धतीने झालेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. या गुंतवणूकीपैकी ८३ टक्के करार थेट परकीय गुंतवणुकीचे आहेत. १...

January 22, 2026 8:36 PM

views 168

महाराष्ट्रातल्या २९ महानगरपालिकांच्या महापौरपदासाठीची आरक्षण सोडत जाहीर

राज्यातल्या २९ महानगरपालिकांमधल्या महापौर पदाची आरक्षणाची सोडत आज मंत्रालयात काढण्यात आली. पुढच्या अडीच वर्षांसाठी ही सोडत निघाली असून, २९ पैकी १५ महापालिकांचं महापौरपद विविध प्रवर्गातल्या महिलांसाठी राखीव झालं आहे.    (राज्यातल्या १७ महानगरपालिकांमधे महापौरपद अनारक्षित राहील. या १७ पैकी मुंबई, नवी ...

January 22, 2026 3:53 PM

views 131

जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी अर्जांची छाननी सुरु

राज्यातल्या १२ जिल्हा परिषदांमधल्या मिळून १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी आज होतआहे. छाननी झाल्यावर वैध उमेदवारांची यादी जाहीर होईल. उद्या आणि परवा तसंच येत्या मंगळवारी म्हणजे २३, २४ आणि २७ तारखेला दुपारी ११ ते ३ या वेळात उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. उमेदवारांच...

January 22, 2026 3:20 PM

views 125

बुलढाणा जिल्ह्यात पाच नवीन ग्रामपंचायतींची स्थापना

बुलढाणा जिल्ह्यात पाच नवीन ग्रामपंचायतींची स्थापना करण्यात आली असून, आता जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतींची संख्या ८७५ झाली आहे. शासन राजपत्रात यासंदर्भातली अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. संत सेवालाल महाराज बंजारा/लमाण तांडा समृद्धी योजनेअंतर्गत चिखली तालुक्यातल्या ग्रामपंचायत अंचरवाडीचे विभाजन करून वसंत...

January 22, 2026 3:14 PM

views 69

मुंबई विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांची दोन सुवर्ण आणि दोन कांस्य पदकांची कमाई

भारतीय विद्यापीठ संघाच्या वतीने आयोजित केलेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय संशोधन महोत्सवात मुंबई विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांनी दोन सुवर्ण आणि दोन कांस्य पदकांची कमाई केली आहे. गुजरातमधल्या सरदार पटेल विद्यापीठात काल ही स्पर्धा झाली. यात मूलभूत शास्त्र आणि सामाजिक शास्त्र गटात दोन सुवर्ण...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.