August 5, 2026 3:52 PM

printer

होमिओपॅथ डॉक्टरांना मान्यता देण्यासंदर्भात आंदोलन तीव्र करण्याचा मार्ड संघटनेचा इशारा

बीएचएमएस डॉक्टर्सना ॲलोपॅथिक औषधं लिहून देण्यास मान्यता देण्याला  विरोध आणि इतर मागण्यांसाठी मार्ड या राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या  संघटनेनं  अपघात आणि आपत्कालीन सेवा वगळता इतर विभागातलं काम बंद ठेवलं आहे. सरकारनं चर्चेसाठी पुढाकार घेतला नाही तर २४ तासांनंतर आपत्कालीन सेवा देखील बंद करण्यात येतील, असा इशारा सेंट्रल मार्डचे अध्यक्ष अथर्व शिंदे यांनी दिला.

न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत बीएचएमएस-सीसीएमपी नोंदणी प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी अशी मागणी मार्ड संघटनेनं केली आहे. या नोंदणीबाबत सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर देखील कोणतेही समाधानकारक आश्वासन मिळालं नसल्याचं संघटनेनं स्पष्ट केलं आहे. 

डॉक्टरांच्या राज्यव्यापी आंदोलनात गोंदिया जिल्ह्यातही संप पुकारण्यात आला आहे. या संपात आय एम चे २२७ डॉक्टर  सहभागी झाले आहेत. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.