पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधे रिक्षाच्या प्रवास भाड्यात १ सप्टेंबरपासूनवाढ

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधे रिक्षाच्या प्रवास भाड्यात वाढ करायला प्रादेशिक परिवहन प्राधिकरणानं मंजुरी दिली आहे. नव्या दरानुसार, पहिल्या दीड किलोमीटरसाठीचं किमान भाडे २५ रुपयांवरून ३० रुपये केलं आहे. तर, त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी आकारलं जाणारं भाडं १७ रुपयांवरून २० रुपये केलं आहे.

 

१ सप्टेंबरपासून नवीन दर लागू होणार आहेत.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.