August 4, 2026 8:03 PM

views 45

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधे रिक्षाच्या प्रवास भाड्यात १ सप्टेंबरपासूनवाढ

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधे रिक्षाच्या प्रवास भाड्यात वाढ करायला प्रादेशिक परिवहन प्राधिकरणानं मंजुरी दिली आहे. नव्या दरानुसार, पहिल्या दीड किलोमीटरसाठीचं किमान भाडे २५ रुपयांवरून ३० रुपये केलं आहे. तर, त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी आकारलं जाणारं भाडं १७ रुपयांवरून २० रुपये केलं आहे.   १ सप्टेंबरपासून नवीन दर लागू होणार आहेत.

January 18, 2026 8:37 AM

views 99

पुण्यात पीएम सेतू कार्यशाळेत शासकीय तंत्र निकेतनांना उद्योगांद्वारे व्यवस्थापित संस्था बनविण्यावर मंथनाचं आयोजन

भारताच्या कौशल्य विकासाला दिशा देण्यासाठी पीएम-सेतु योजनेअंतर्गत, पुण्यात यशदा इथं उद्या एक उद्योग कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. शासकीय तंत्र निकेतनांमध्ये उद्योगांच्या मदतीनं सुधारणा करुन त्यांना उद्योग-व्यवस्थापित संस्था बनविण्याच्या उद्देशानं ही कार्यशाळा होत आहे.  पीएम सेतु म्हणजे म्हणजे प्रधानमंत्री स्किलिंग अँड एम्प्लॉयबिलिटी ट्रान्सफॉर्मेशन थ्रू अपग्रेडेड ITIs ही योजना विकसित भारताच्या दृष्टीकोनाशी सुसंगत असून,भविष्यासाठी सज्ज आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक मनुष्यबळ घडविणे, उद्योग क्ष...

January 18, 2026 8:31 AM

views 144

ग्रँड टूर सायकल स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्यात सज्जता.

पुणे ग्रँड चॅलेंज सायकलिंग स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्यामध्ये सज्जता करण्यात आली आहे. उद्यापासून २३ तारखेपर्यंत जिल्ह्यातील ४३७ किलोमीटर मार्गावरून जगभरातील 35  संघांमधील 170 आणि भारताचे अ आणि ब संघातील सायकलपटू पुण्याचा नागरी परिसर, वारसा-संपन्न स्थळं आणि रमणीय ग्रामीण प्रदेशातून सायकल चालविण्याचं आव्हान एकंदर चार टप्प्यांमध्ये पार करणार आहेत.    या स्पर्धेत सहभागी सायकलपटूंचा स्वागत समारंभ आणि उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल पुण्यात झालं. पुण्याचा सायकलींशी असलेला ऋणानुबंध १०...

January 1, 2026 3:33 PM

views 314

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी २ हजार ३४९ उमेदवारी अर्ज वैध

महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची काल छाननी झाली. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी २ हजार ५१६ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. राज्य निवडणूक आयोगाने केलेल्या छाननीत त्यातले १६७ अर्ज अवैध ठरले. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ९४६ अर्ज दाखल झाले. या अर्जांच्या छाननीनंतर ११७ अर्ज अवैध ठरले तर ८३९ अर्ज वैध ठरले.   सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी एकूण १ हजार ४६० अर्ज दाखल झाले होते. छाननीत या अर्जांपैकी २३० अर्ज अवैध ठरले असून १...

December 22, 2025 8:45 PM

views 71

लवासा प्रकल्पाला दिलेल्या परवानग्यांची सीबीआय चौकशीची मागणी जनहित याचिका फेटाळली

पुण्याजवळच्या लवासा प्रकल्पाला कथित बेकायदेशीर परवानग्या दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या सीबीआय चौकशीची मागणी करणारी २०२३ सालची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. पोलिसांनी याबाबतीत एफआयआर दाखल करावा असा आदेश न्यायालयानं देण्यासाठी कायद्यात तरतूद नसल्यामुळे ही याचिका फेटाळल्याचं उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम आंखड यांच्या खंडपीठाने  म्हटलं आहे.  याचिकाकर्त्याने वारंवार याच आरोपांची या...

December 13, 2025 3:07 PM

views 104

पुण्यात अनधिकृत गौण खनिज उत्खननप्रकरणी कारवाई

अनधिकृत गौण खनिज उत्खननप्रकरणी राज्य सरकारनं ४ तहसिलदार, ४ मंडळ अधिकारी आणि २ तलाठ्यांना निलंबित केलं आहे. पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यात वनीकरणासाठी राखीव असलेल्या क्षेत्रातून ९० हजार ब्रास अनधिकृत गौण खनिजाच्या उत्खनन प्रकरणी ही कारवाई झाली आहे. आमदार सुनील शेळके यांनी काल ही लक्षवेधी विधानसभेत मांडली होती.    राज्यभरातल्या अवैध उत्खननाला लगाम लावण्यासाठी प्रत्येक जिल्हा, तालुका आणि गावाचा ईटीएस सर्वे सुरू झाला आहे. यामुळे किती परवानग्या दिल्या आणि किती अवैध उत्खनन झाले, याची माहिती मि...

November 20, 2025 3:04 PM

views 126

पुणे-माणगाव रस्त्यावर ताम्हिणी घाटात झालेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यू

पुणे - माणगाव मार्गावर ताम्हिणी घाटात झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून दोन जण बेपत्ता आहे. परवा रात्री ही घटना घडलेल्या या अपघाताची माहिती आज समोर आली.   चालकाचे नियंत्रण सुटल्यानं गाडी दरीत कोसळली. या वाहनातल्या तरुणांशी संपर्क होत नसल्यानं त्याच्या पालकांनी शोध सुरू केल्यावर हा अपघात झाल्याचं लक्षात आलं. पोलिस ड्रोनच्या मदतीनं मृतांचा शोध घेत आहेत.

November 9, 2025 3:25 PM

views 83

पुण्यातल्या कोरेगाव पार्क आणि बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे

पुण्यातल्या कोरेगाव पार्क आणि बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.  या व्यवहारातली कुलमुखत्यारपत्रधारक शीतल तेजवानी परदेशात पळून गेल्याची चर्चा असली तरी त्याला पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही. या प्रकरणांतली कागदपत्रं संबंधित शासकीय विभागाकडून मागवण्यात आली आहेत. त्याची पडताळणी करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे, असं सूत्रांनी सांगितलं.

November 8, 2025 3:10 PM

views 85

पुणे जमीन घोटाळ्यात कोणत्याही दोषीला सोडलं जाणार नाही, अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही

पुणे जमीन घोटाळ्यात कोणत्याही दोषीला सोडलं जाणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. नागपूर इथे आज वार्ताहरांशी ते बोलत होते. या प्रकरणात अनियमितता झाल्याचंही स्पष्ट झालं असून अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. प्रकरणाची व्याप्ती आणि संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असं ते म्हणाले.   प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे आणि या संपूर्ण व्यवहारात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांना निलंबित ...

October 11, 2025 7:12 PM

views 102

राज्यातल्या ९ जिल्ह्यांसह देशातल्या १०० जिल्ह्यांमध्ये पीएम धनधान्य कृषी योजनेची सुरुवात

राज्यात पुणे इथं आयोजित कार्यक्रमात आज धनधान्य कृषी योजनेचा प्रारंभ कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत झाला. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं जाईल, असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले. कडधान्य हे आपल्या आहारातील प्रथिनाचं मुख्य साधन असून आपल्या देशात अजूनही कडधान्याची कमतरता आहे. त्यामुळे हरभरा, मूग, तूर, उडीद, मसूर या डाळींचं उत्पादन वाढवण्याचं उद्दिष्ट सरकारने ठेवलं आहे, असं कृषीमंत्री म्हणाले. शेतीसाठी सूक्ष्म सिंचनाचा अवलंब करा, सेंद्रीय खताचा वापर करा...