July 31, 2024 3:29 PM

views 56

पुणे, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. पुणे आणि सांगली जिल्ह्याच्या विविध भागात सकाळपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. सखल भागांमध्ये पाणी भरू लागलं आहे. धरण क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्यानं, दोन्ही जिल्ह्यातल्या नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे.

July 26, 2024 7:38 PM

views 51

पुण्यात स्वच्छता मोहिम राबवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

पुण्यात काल अतिवृष्टीमुळे पसरलेला चिखल आणि गाळ यांच्या सफाईसाठी खाजगी कंपन्यांच्या मदतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसंच पुरामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि महापालिका यांच्यातल्या समन्वयाअभावी कालची पूरपरिस्थिती उद्भवली. यापुढे प्रशासन तसंच अधिकाऱ्यांनी समन्वय साधण्याची काळजी घ्यावी, असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शासकीय विश्रामगृह आयोज...

July 26, 2024 9:50 AM

views 74

महाराष्ट्रात पुण्यासह अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत

महाराष्ट्रात पुणे, मुंबई, ठाण्यासह इतरही अनेक जिल्ह्यात काल पावसाचा जोर होता. पुणे शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस आणि धरणातून सुरू असलेला विसर्ग यामुळं काल शहरातील काही भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक जिल्ह्यातील नद्यांना पूर आले असून, अनेक ठिकाणी नागरी वस्तीत पाणी शिरलं आहे. त्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे.   अनेक गावांचा संपर्क तुटला असून, राष्ट्रीय महामार्गांवरील वाहतूकही प्रभावित झाली आहे. अनेक ठिकाणी पुरामुळं नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे. ठिकठिकाणी...

July 20, 2024 11:07 AM

views 59

पुण्यात आणखी 3 जणांना झिकाचा संसर्ग

पुण्यात आणखी 3 जणांना झिकाचा संसर्ग झाला आहे. यामध्ये एका गर्भवतीसह 2 ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. शहरातल्या झिकाच्या रुग्णांची संख्या आता 27 झाली असल्याचं महापालिकेच्या आरोग्य विभागानं म्हटलं आहे. यामध्ये 11 गर्भवती आहेत. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर शहरातल्या 2 गरोदर महिलांचा झिका विषाणूचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. या दोघींना कोणतीही लक्षणं नाहीत तसंच त्यांच्या गर्भाची प्रकृतीही चांगली आहे.   मात्र खबरदारीचा उपाय म्हणून दोन दिवसांपासून पुन्हा नव्यानं संपूर्ण शहराचं सर्वेक्षण सुरू क...

July 15, 2024 12:38 PM

views 56

पुण्यात झिका या विषाणूजन्य आजाराचे सर्वाधिक रूग्ण

राज्यात झिका या विषाणूजन्य आजाराचे सर्वाधिक रूग्ण पुण्यात आढळले आहेत.राज्यातील एकंदर २१ रूग्णांपैकी १९ रूग्ण पुण्यात, एक कोल्हापूरमध्ये तर एक संगमनेरमध्ये आढळून आला आहे.   राज्यभरात आतापर्यंत २११ गर्भवतींचे रक्तनमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यातल्या १० महिलांना झिकाची लागण झाल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

July 8, 2024 1:20 PM

views 48

पुणे : ‘हीट एन्ड रन’च्या दोन वेगवेगळ्या घटनांत दोन पोलिस कॉन्स्टेबल्सचा मृत्यू

पुण्यात काल रात्री घडलेल्या हीट एन्ड रनच्या दोन वेगवेगळ्या घटनांत  दोन पोलिस कॉन्स्टेबल्सचा मृत्यू झाला असून  एक पोलिस कॉन्स्टेबल जखमी झाला आहे. जुन्या पुणे - मुंबई महामार्गावर हॅरिस ब्रीजच्या खालील बिटवरचे  दोन पोलिस कॉन्स्टेबल रात्रीची गस्त घालण्यासाठी दुचाकीवरुन निघाले असताना पाठीमागून आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात एका पोलिस शिपायाचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह फरार झाला आहे. तर दुसऱ्या घटनेत  चिंचवड मधील पोलीस शिपाई  पिंपळे सौदागर भागातुन दु चाकीवरुन न...

July 7, 2024 6:04 PM

views 65

पुण्यात झिका विषाणूचे आणखी दोन रुग्ण

पुणे शहरात झिका विषाणूचे आणखी दोन रुग्ण आढळून आले आहेत. कर्वेनगर परिसरात राहणारी ४२ वर्षीय महिला आणि खराडीची रहिवासी असलेली २२ वर्षीय तरुणी यांना झिकाची लागण झाल्याचं आढळून आल्याने शहरातल्या झिका संसर्गबाधितांची संख्या १२वर गेली आहे.

June 29, 2024 10:24 AM

views 66

पुण्यातील अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक

पुण्यातील अमली पदार्थ सेवन प्रकरणी पोलिसांनी तीन अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक केली आहे. त्यातील एकजण नायजेरियन तर दोन पुण्यातील आहेत. यातल्या एका आरोपीने L3 हॉटेलच्या पार्टीमध्ये ड्रग्स पुरवले होते. L3 बारवर झालेल्या कारवाईमध्ये आतापर्यंत १३ जणांना अटक केली आहे.  

June 25, 2024 8:05 PM

views 60

पुणे पोर्शे प्रकरण : अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहातून सुटका करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

पुणे पोर्श कार अपघात प्रकरणातल्या अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहातून तत्काळ सुटका करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत.   बाल न्याय मंडळानं आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला आव्हान देत आरोपीच्या आत्यानं उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर झाल्यानंतर त्याला ताब्यात घेणं बेकायदेशीर आहे, असा युक्तिवाद यावेळ...

June 24, 2024 7:08 PM

views 52

पुण्यात अंमली पदार्थ प्रकरणी ९ जणांवर गुन्हा दाखल

पुण्यातल्या अंमली पदार्थ प्रकरणात आतापर्यंत ९ जणांवर गुन्हा दाखल झाला असून ८ जणांना अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्या मुलांचा पुणे पोलिस शोध घेत आहे. याप्रकरणी हलगर्जीपणा आणि लक्ष ठेवण्यात दिरंगाई केली म्हणून दोन अधिकारी आणि दोन अमलदारांचं निलंबन केल्याची माहिती पोलिस उपायुक्त संदीप गिल यांनी दिली आहे. सीसीटीव्ही चित्रण पाहून तपासणी केली जाणार असल्याचं ते म्हणाले.