September 7, 2025 3:54 PM

views 77

राज्यात ठिकठिकाणी भक्तीभावानं गणरायाला निरोप

राज्यात इतरत्रही भक्तीभावानं गणरायाला निरोप दिला गेला. ठिकठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात, टाळ-मृदंगांच्या तालावर गणरायाला निरोप देण्यासाठी निघालेल्या भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत असल्याचं चित्र दिसत होतं. पुण्यात मानाच्या पाचही गणपतींचं विसर्जन झालं, मात्र काही ठिकाणी आज दुपारपर्यंत विसर्जन मिरवणुका सुरु होत्या. जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यातही ढोल तश्याच्या गजरात लाडक्या गणरायाला निरोप दिला गेला. अमळनेर इथं आज पहाटे ५ वाजेपर्यंत, तर शहरात रात्री १ वाजेपर्यंत मुख्य मिरवणूका सुरू होत्या. या मिरवणूक प...

August 3, 2025 8:04 PM

views 52

मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम वेगाने होणार – रेल्वे मंत्री

मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम वेगाने होत असून लौकरच या दोन शहरातलं अंतर केवळ २ तास ७ मिनिटांवर येईल असं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. गुजरातमधे भावनगर रेल्वे स्थानकात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.   भावनगर ते अयोध्या या साप्ताहिक गाडीला वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवला. पुण्याहून मध्यप्रदेशातल्या रिवा कडे जाणाऱ्या तसंच जबलपूर ते रायपूर या गाडीचं उद्घाटनही त्यांनी दूरस्थ पद्धतीनं केलं. गेल्या अकरा वर्षात ३४ हजार किलोमीटरचे नवे रेल्वेमार्ग तयार झाले असून भारतीय रेल्वेचं मोठ...

August 3, 2025 3:21 PM

views 66

पुणे जिल्ह्यात हिंसाचाराप्रकरणी आतापर्यंत १५ जणांना अटक

पुणे जिल्ह्यात यवत इथे झालेल्या हिंसाचाराप्रकरणी आतापर्यंत १५ जणांना अटक झाली असून ५००हून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या १५ आरोपींना ६ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात येणार आहे.   हिंसाचाराला कारणीभूत ठरलेली वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणालाही अटक करण्यात आली आहे. यवतमध्ये सध्या शांतता असून समाज माध्यमांवर पोलीस लक्ष ठेवून आहेत. या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीत कोणताही पूर्वनियोजित कट आढळला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

July 4, 2025 8:42 PM

views 73

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं केलं अनावरण.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या त्रिशक्ती प्रवेशद्वारावर थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण केलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी अमित शहा यांच्या हस्ते शिल्पकार विपुल खटावकर आणि स्थापत्यकार अभिषेक यांचा सत्कार करण्यात आला. पेशवा बाजीराव स्मारकची योग्य जागा ही राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ह...

June 22, 2025 7:13 PM

views 79

पुण्यातल्या धोकादायक वाडे तसंच इमारतींना रिकामी करण्याची नोटीस

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगर पालिकेने शहराच्या मध्यवर्ती भागातल्या धोकादायक वाडे तसंच इमारतींना रिकामी करण्याची नोटीस दिली आहे. जीवितहानी होऊ नये यासाठी या वाड्यांचं पाणी आणि वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. वाडे रिकामी करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या बांधकाम विभागाने दिली आहे. बांधकाम विभागाने यंदा ११६ धोकादायक वाड्यांना नोटिसा बजावली असून त्यापैकी ७६ वाडे रिकामी करण्यात आले आहेत.

June 16, 2025 1:15 PM

views 66

पुण्यातल्या इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळल्यानं ४ जणांचा मृत्यू

पुणे जिल्ह्यात इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला, तर ५१ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. त्यापैकी ८ जणांची प्रकृती गंभीर आहे. दोन ते तीन जण अद्यापही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.    दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं असून, या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.    या अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना राज्य सरकारन...

May 30, 2025 2:40 PM

views 61

पुण्यात १ जूनला गुंतवणूकदार शिबिराचं आयोजन

केंद्र सरकारच्या कंपनी व्यवहार मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरणाने अर्थात आयईपीएफए ने भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डच्या सहकार्याने गुंतवणूकदार शिबिर या उपक्रमाची घोषणा केली आहे.  आयईपीएफए चं  पहिलं शिबीर १ जून रोजी पुणे इथं होईल. 

April 9, 2025 7:46 PM

views 71

पुण्यातल्या ८६० रुग्णालयांची तपासणी

आरोग्य विभागानं दिलेल्या आदेशानुसार पुणे  महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील 860 रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. दर्जेदार सेवा, रुग्णांना सेवा मिळण्यास काही अडचणी आहेत का, रुग्ण हक्क संहिता, दरपत्रक, मोफत क्रमांक लावले आहे का याची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये  त्रुटी आढळलेल्या 89 रुग्णालयांना पुणे  महापालिकेच्या आरोग्य विभागानं नोटीस बजावली आहे.   दरम्यान, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय परिसरात 100 मीटर पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश पोलिसांनी लागू केले आहेत. यानुसार रुग्णालय परिसरात रुग्णाचे न...

April 4, 2025 8:24 PM

views 46

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातल्या मृत्यूप्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश

पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीनं उपचार न मिळाल्यानं तनिषा भिसे या महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुण्याच्या धर्मादाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज दिले. या समितीत उपसचिव, कक्ष अधिकारी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय यांचे प्रतिनिधी, मुंबईच्या सर जे. जे. रुग्णालय समूहाचे अधीक्षक हे सदस्य असतील. त्याचप्रमाणे या घटनेची तज्ञ डॉक्टरांच्या समितीद्वारे चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले...

March 19, 2025 7:43 PM

views 56

पुण्याच्या टेम्पो ट्रॅव्हलरला लागलेल्या आगीत 4 जणांचा मृत्यू

पुण्याच्या हिंजवडी भागात टेम्पो ट्रॅव्हलरला लागलेल्या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर पाचजण जखमी झाले. आज सकाळी आठच्या सुमाराला चालकाच्या पायाखाली आग लागली. चालकाने गाडीचा वेग कमी केल्यावर त्याच्यासह पुढे बसलेले कर्मचारी गाडीतून खाली उतरले.   मात्र, दुसऱ्या बाजूचं दार न उघडल्याने इतरांना बाहेर पडता आलं नसल्यानं त्यातल्या काहींचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेतल्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.