March 19, 2025 3:27 PM

views 48

हिंजवडीत टेम्पोला लागलेल्या आगीत ४ जणांचा मृत्यू

पुण्याच्या हिंजवडी भागात टेम्पो ट्रॅव्हलरला लागलेल्या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर पाचजण जखमी झाले. आज सकाळी आठच्या सुमाराला चालकाच्या पायाखाली आग लागली. चालकाने गाडीचा वेग कमी केल्यावर त्याच्यासह पुढे बसलेले कर्मचारी गाडीतून खाली उतरले. मात्र, दुसऱ्या बाजूचं दार न उघडल्याने इतरांना बाहेर पडता आलं नसल्यानं त्यातल्या काहींचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेतल्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

March 10, 2025 6:16 PM

views 40

ऊस तोडणी मशिन मालकांचं पुण्यात साखर आयुक्तांच्या कार्यालयासमोर आंदोलन

ऊस तोडणी मशीनचा दर वाढवून मिळावा, बँकेच्या हप्त्यांना मुदतवाढ मिळावी या आणि इतर मागण्यांसाठी ऊस तोडणी मशिन मालकांनी आज पुण्यात साखर आयुक्तांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं. मागण्या पूर्ण न झाल्यास राज्यातले तेराशे मशिन मालक आपल्या मशिन घेऊन साखर संकुल आणि मंत्रालयाला घेराव घालतील असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. गेल्या पाच वर्षांपासून मागणीसाठी पाठपुरावा करूनही शासन केवळ आश्वासनं देत असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला आहे.

February 27, 2025 12:44 PM

views 84

पुणे बलात्कार प्रकरणातल्या आरोपीची माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर

पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकातल्या बलात्कार प्रकरणातल्या आरोपीची माहिती देणाऱ्याला एक लाख रुपयांचं बक्षीस पुणे पोलिसांनी जाहीर केलं आहे. या प्रकरणातला आरोपी मंगळवारपासून फरार असून त्याला शोधण्यासाठी १३ पथकं कामाला लागली असल्याचं पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं. आरोपीची माहिती देणाऱ्याची ओळक गुप्त ठेवली  जाईल असंही त्यांनी सांगितलं. 

February 21, 2025 7:34 PM

views 87

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या पुणे दौऱ्यावर

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह उद्या पुणे दौऱ्यावर येत आहेत. गृह मंत्रालयाच्या पश्चिम विभागीय परिषदेच्या २७व्या बैठकीचं अध्यक्षस्थान ते भूषवणार आहेत. लैंगिक शोषण, महिला अत्याचारांच्या प्रकरणांच्या जलद तपासासाठी जलदगती विशेष न्यायालयांची स्थापन करणं, आपत्कालीन प्रतिसाद समर्थन प्रणालीची अंमलबजावणी, पायाभूत सुविधांशी संबंधित मुद्दे, यासह विविध मुद्द्यांवर या परिषदेत विचारमंथन अपेक्षित आहे.    आपल्या पुणे दौऱ्यात अमित शहा जनता सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभालाही उ...

February 20, 2025 7:30 PM

views 69

पुण्यात २ जीबीएस रुग्णांचा मृत्यू

पुणे शहरात आणखी दोन रुग्णांचा गुलियन बॅरे सिन्ड्रोम या आजारानं मृत्यू झाला आहे. या आजारानं आता पर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 211 जणांना जीबीएसचं निदान झालं आहे.

February 16, 2025 8:25 AM

views 50

पुण्यात शेतकऱ्यांना ओळखपत्राचं वाटप

पुणे जिल्ह्यात आत्तापर्यंत २ लाख ८ हजार ८८६ शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आले आहेत. त्यात सर्वाधिक ओळख क्रमांक जुन्नर तालुक्यात दिले आहेत. पुणे शहरात शेतकऱ्यांची संख्या कमी असल्यानं केवळ २१ शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आले . शेतकऱ्यांकडे जमीन, कर्ज, मिळणार्या योजनांचा लाभ आदी माहिती असणारं एक ओळखपत्र ऍकग्रिस्टेकच्या माध्यमातून दिलं जातं. कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी यापुढे ओळख क्रमांक गरजेचा आहे. त्यामुळे शेतकर्यांदनी नोंदणी करून लवकरात लवकर ओळख क्रमांक घ्यावा असं आवाहन उपजिल्हाध...

February 16, 2025 8:21 AM

views 74

पुण्यात जीबीएसचे २०८ रुग्ण

पुणे विभागात गुइलेन बॅरे सिंड्रोम म्हणजे जीबीएस चे आतापर्यंत २०८ रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांमध्ये प्रामुख्यानं कॅम्पायलो-बॅक्टर जेजुनी आणि नोरोव्हायरसचा संसर्ग आढळून आला असून, हेच जीबीएस उद्रेकाचं कारण असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागानं दिली आहे.   या रुग्णांपैकी 42 रुग्ण पुणे महापालिका हद्दीतले, 94 रुग्ण पुणे महापालिकेत नव्यानं समाविष्ट केलेल्या गावांमधले, 30 पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतले तर 32 पुणे ग्रामीण भाग आणि 10 रुग्ण इतर जिल्ह्यातले आहेत. सिंहगड रस्ता परिसरात आढळलेले ...

February 14, 2025 9:34 AM

views 55

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच दिमाखदार सोहळ्यात उद्घाटन

पुणे फिल्म फाउंडेशन, महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभाग आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात पिफचं उद्घाटन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते काल झालं. महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल, विश्वस्त सतीश आळेकर, ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांच्यासह सांस्कृतिक विभागाचे वरिष्ठ अधिकारी महोत्सवाचे आंतरराष्ट्रीय परीक्षक, तज्ञ आणि रसिक यावेळी उपस्थित होते.   राज्य सरकार मुंबईत 10 एकर जागेवर मनोरंजन क्षेत्रातली...

February 7, 2025 10:59 AM

views 56

पुण्यात जीबीएसचे 173 संशयित रुग्ण

पुण्यात जीबीएसच्या संशयित रुग्णांची संख्या 173 झाली असून, 140 जणांना या आजाराचं निदान झालं आहे. या आजारमुळे आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. जीबीएसच्या 72 रुग्णांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं असून 21 जण जीवरक्षक प्रणालीवर आहेत. दरम्यान, दूषित पण्यामुळेच जीबीएस आजार होत असल्याचा अहवाल एनआयव्हीने दिला आहे. जीबीएसच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन, एनआयव्ही आणि राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची महापालिकेत संयुक्त बैठक झाली. या बैठकीत एनआयव्हीच...

February 5, 2025 11:08 AM

views 47

पुण्यात 13 फेब्रुवारीपासून रंगणार तेवीसावा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

तेवीसावा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025 अर्थात पिफ-13 ते 20 फेब्रुवारी दरम्यान पुण्यात होणार आहे. महोत्सवाचं उद्घाटन राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांच्या हस्ते 13 तारखेला होणार असल्याची माहिती महोत्सवाचे संचालक डॉक्टर जब्बार पटेल यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. 'शो मॅन-राज कपूर' ही यंदाच्या महोत्सवाची संकल्पना आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे तसंच ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना पिफ डिस्टींग्विशिंग अवॉर्ड या लक्षवेधी पुरस्कारानं सन्मानित करण...