January 27, 2025 7:25 PM

views 51

फुले वाडा, सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी प्रशासकीय मान्यता

पुण्यातल्या महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादन तसेच रहिवाशांचं इतर ठिकाणी पुनर्वसन करायला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. या कामांसाठी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला असून प्रशासकीय मान्यता मिळाल्यानं आता स्मारक विस्तारीकरणाला गती मिळणार आहे.

January 27, 2025 7:08 PM

views 57

गुलेन बॅरी सिंड्रोमच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं पथक पुण्यात दाखल

गुलेन बॅरी सिंड्रोम या आजारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं पथक पुण्यात दाखल झालं आहे. या ७ सदस्यीय पथकात राष्ट्रीय संसर्गजन्य आजार नियंत्रण संस्था, भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था, तसंच राष्ट्रीय विषाणू संस्थेतल्या तज्ञांचा समावेश आहे.    या आजाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता १०१ झाली आहे. त्यातले ८१ पुणे महापालिका क्षेत्रात, १४ पिंपरी चिंचवड भागात, तर ६ इतर जिल्ह्यांमधले आहेत. याप्रकरणी २५ हजारांहून अधिक घरांची पाहणी महापालिकेनं केली आह...

January 23, 2025 7:23 PM

views 54

गुईलेन बॅरे सिंड्रोम आजार संसर्गजन्य नसून नागरिकांनी घाबरू नये – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे शहरात सध्या गुईलेन-बॅरे सिंड्रोम या आजारानं डोकं वर काढलं आहे, मात्र हा संसर्गजन्य आजार नाही, त्यामुळं नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असं आवाहन उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आज केलं. याबाबतच्या  आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. गुईलेन-बॅरे सिंड्रोम आजाराची लागण झालेल्यांची संख्या आता ५९ झाली आहे.

January 22, 2025 7:34 PM

views 52

पुण्यात ‘गुलियन बॅरी सिंड्रोम’ या आजाराचे २४ रुग्ण, प्रशासन ॲक्शन मोडवर

पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिका क्षेत्रात गेल्या दोन आठवड्यांपासून अचानक जीबीएस, अर्थात 'गुलियन बॅरी सिंड्रोम' या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. जीबीएस हा चेतासंस्थेशी संबंधित दुर्मिळ आजार आहे. पुण्यातला सिंहगड रस्ता, धायरी, नऱ्हे, विश्रांतवाडी, पर्वती, कसबा, कोथरूडसह उपनगर आणि ग्रामीण भागात या आजाराची लागण झालेले रुग्ण आढळून येत आहेत. २४ रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी काहीजण अतिदक्षता विभागात असून दोन कृत्रिम श्‍वसोच्‍छवास प्रणालीवर आहेत.    या आ...

January 12, 2025 11:16 AM

views 65

पुण्यातील लष्कर दिन सोहोळ्यात नेपाळ लष्कराच्या वाद्यवृंदाचा प्रथमच सहभाग

77 व्या लष्कर दिनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आयोजित दक्षिण विभागाच्या सन्मान सोहोळ्यात, लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या हस्ते विविध पदकं देऊन, लष्करी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. तसंच या दिनाच्या संचलनाची रंगीत तालीम काल घेण्यात आली. पंधरा जानेवारीला होणाऱ्या लष्कर दिन सोहोळ्यात नेपाळ लष्कराचा वाद्यवृंद प्रथमच सहभागी होणार आहे.    लष्कर दिन सोहळ्यात 7 वाद्यवृंद सहभागी होणार असून नेपाळ लष्कर वाद्यवृंद चाही यामध्ये समावेश आहे. भारतीय लष्कर दिन ...

January 9, 2025 7:21 PM

views 55

पुण्यात संविधान सन्मान दौडचं आयोजन

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीनं पुण्यात 'संविधान सन्मान दौड आयोजित केली आहे. स्पर्धकांची नावनोंदणी सुरू झाली असून येत्या २५ तारखेला पहाटे ५ वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या खाशाबा जाधव क्रीडा संकुलातून ही स्पर्धा सुरू होईल.

January 9, 2025 6:58 PM

views 54

तृणधान्याला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पणन विभागाची – मंत्री जयकुमार रावल

शेतकऱ्यांनी पिकवलेल्या तृणधान्याला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पणन विभागाची आहे, असं प्रतिपादन पणनमंत्री जयकुमार रावल यांनी आज पुण्यात केलं. ते आज पुण्यात पणन मंडळाच्या वतीनं आयोजित भरडधान्य महोत्सवाचं उद्घाटन करताना बोलत होते. भरडधान्य जनजागृतीसाठी काढलेल्या दुचाकी फेरीलाही रावल यांनी हिरवा झेंडा दाखवला.    राज्याच्या विविध भागातून भरडधान्य उत्पादक, प्रक्रिया उद्योगामध्ये कार्यरत असणारे बचतगट, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्टार्ट अप कंपन्या यात सहभागी झाल्या आहेत...

January 5, 2025 10:26 AM

views 67

पुण्यात आयोजित ‘Know Your Army’ मेळाव्यामध्ये सैन्य विषयक माहिती देणारं दालन

लष्कर दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पुण्यात आयोजित Know Your Army मेळाव्यामध्ये केंद्रीय संचार ब्यूरोचं, सैन्य विषयक माहिती देणारं एक दालन उभारण्यात आलं आहे. या बहुमाध्यम प्रदर्शनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी भेट दिली. भारतीय लष्कराशी संबंधित छायाचित्र आणि माहिती देणारं हे प्रदर्शन आज सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुलं असणार आहे.

January 5, 2025 8:39 AM

views 83

पुण्यातील विकासकामांचा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून आढावा

पुणे शहरातील प्रकल्प महापालिका प्रशासनानं वेगानं पूर्ण करावेत; शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली असून त्यावर तातडीने कारवाई करून नागरिकांसाठी रस्ते मोकळे करावेत अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असा इशारा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल प्रशासनाला दिला. पुणे शहरात महापालिकेतर्फे सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी मोहोळ यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांची भेट घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मोहोळ बोलत होते.

December 1, 2024 10:27 AM

views 62

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारतीय जैन संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनाचं उद्घाटन

भारतीय जैन संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनाचं उद्घाटन काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यातील बिबवेवाड़ी इथं झालं. भगवान महावीर आणि जैन धर्मातील अन्य तीर्थंकरानी सांगितल्याप्रमाणे आपण घेण्यापेक्षा देण्यावर जास्त भर द्यायला हवा असं प्रतिपादन त्यांनी केलं. जैन समाजातील व्यक्ति कमाईपेक्षा जास्त समाजाला देण्यावर विश्वास ठेवतात. समाजातल्या प्रत्येक व्यक्तीची उन्नती करण्याचं ध्येय समोर ठेवून येणाऱ्या पिढ्यांना घडवण्याचं काम भारतीय जैन संघटना करत आहे त्यामुळे हा केवळ एका समाजाचा कार्यक्र...