August 14, 2026 9:23 PM

views 20

जपानमध्ये पावसामुळे सहा जणांचा मृत्यू

जपानच्या पूर्व भागात कालपासून संततधार पाऊस झाल्यामुळे पूरस्थिती निर्माण होऊन सहा जणांचा मृत्यू झाला आहे.   टोकियोजवळच्या चिबा प्रांताला आज दिवसभरासाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चिबा आणि टोकियोच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

August 14, 2026 9:24 PM

views 7

कोकण, मध्य महाराष्ट्र, गोव्यात अतिजोरदार पावसाचा अंदाज

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि गोवा इथं आज अति जोरदारपाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तसंच छत्तीसगढला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे.   तसंच गंगेच्या खोऱ्यातला पश्चिम बंगालचा भाग, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा, आणि उत्तराखंड मध्येही आज पावसाचा ऑरें...

August 14, 2026 9:23 PM

views 30

गडचिरोली आश्रमशाळेतील सर्पदंश प्रकरणाची NHRC कडून दखल

   महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात जपतलाई आश्रमशाळेमधल्या वसतिगृहात सर्पदंशामुळे झालेल्या तीन विद्यार्थिनींच्या मृत्युप्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वतःहून दखल घेतली आहे.   या प्रकरणात राज्याच्या मुख्य सचिवांना आयोगानं नोटीस बजावली असून दोन आठवड्यांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्दे...

August 14, 2026 9:23 PM

views 6

झारखंडमध्ये बस-ट्रक अपघातात तिघांचा मृत्यू, १० जखमी

   झारखंडमध्ये कोडरमा जिल्ह्यात आज पहाटे भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसची ट्रकला धडक बसल्यामुळे तिघांचा मृत्यू झाला तर १० जण जखमी झाले आहेत. मृत्युमुखी पडलेले तीनही जण नेपाळचे रहिवासी आहेत.   नेपाळच्या रौतहट जिल्ह्यातल्या ४५ भाविकांना घेऊन जाणारी ही बस देवघर जिल्ह्यात बाबा वैद्यनाथ धाम आणि दुमका इथ...

August 14, 2026 9:30 PM

views 9

सावरकर वक्तव्य प्रकरणी राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या  मानहानीकारक वक्तव्यांप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल झालेली मानहानीची तक्रार तसंच कनिष्ठ न्यायालयाने बजावलेलं समन्स सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केलं. या प्रकरणात आवश्यक मंजुरी घेतली नसल्याचं सांगत न्यायमूर्ती दीपांक...

August 14, 2026 9:23 PM

views 14

१४ ऑगस्ट : फाळणी वेदना स्मृती दिन

आज १४ ऑगस्ट. आजचा दिवस संपूर्ण देशात ‘फाळणी वेदना स्मृती दिन’ म्हणून पाळला जातो. आजच्या फाळणी वेदना स्मृती दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फाळणीच्या काळात जीव गमावलेल्या नागरिकांच्या स्मृतीला आदरांजली वाहत त्यांच्या धैर्याचे स्मरण केलं.   आजच्या दिवशी देशाची फाळणी झाली. या फाळणीमुळे...

August 14, 2026 8:51 PM

views 46

जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार, सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी

सध्या सुरू असलेल्या जनगणनेत विचारल्या जाणणाऱ्या प्रश्नांची यादी अधिसूचनेद्वारे देशाचे जनगणना आयुक्त आणि महा रजिस्ट्रार यांनी आज राजपत्रात प्रसिद्ध केली आहेत. त्यात नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. २०११ मध्ये झालेल्या जनगणनेच्या वेळी केवळ अनुसूचित जाती आणि जमातीच्या नागरिकांना ...

August 14, 2026 9:24 PM

views 39

उत्तराखंडमध्ये बोगद्यात दरड कोसळल्यामुळे ७ जणांचा मृत्यू

उत्तराखंडमध्ये चमोली जिल्ह्यात पीपलकोटी इथं जलविद्युत परियोजना प्रकल्पाच्या निर्माणाधिन बोगद्यात भूस्खलन आणि पाण्याची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला तर १४ जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना  काल संध्याकाळी घडली. या निर्माणाधिन बोगद्यात २२ कामगार होते. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे...

August 14, 2026 10:17 AM

views 30

राष्ट्रकूल तलवारबाजी स्पर्धेत 35 पदकांसह भारताला विजेतेपद

 नायजेरियातील लागोस इथं चार दिवस झालेल्या राष्ट्रकूल तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारतानं एकूण 35 पदकं जिंकून सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं. या स्पर्धेत 23 वर्षाखालील ' आणि वरिष्ठ अशा दोन्ही गटांत भारतीय खेळाडूंनी 13 सुवर्ण, 8 रौप्य आणि 14 कांस्य पदकं जिंकली. स्पर्धेच्या चौथ्या आणि अंतिम दिवशी भार...

August 13, 2026 8:23 PM

views 19

होर्मूझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं पूर्ण नियंत्रण असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

होर्मूझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं पूर्ण नियंत्रण असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी आज फेटाळून लावला.   गुप्तचर यंत्रणांच्या अपयशामुळे धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या जलमार्गाबाबत अमेरिकेकडून वारंवार चुकीचे अंदाज लावले जात असल्याचा ...