August 14, 2026 9:24 PM

printer

उत्तराखंडमध्ये बोगद्यात दरड कोसळल्यामुळे ७ जणांचा मृत्यू

उत्तराखंडमध्ये चमोली जिल्ह्यात पीपलकोटी इथं जलविद्युत परियोजना प्रकल्पाच्या निर्माणाधिन बोगद्यात भूस्खलन आणि पाण्याची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला तर १४ जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना  काल संध्याकाळी घडली. या निर्माणाधिन बोगद्यात २२ कामगार होते. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल  तसंच अन्य बचाव यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या दुर्घटनेबद्दल चिंता व्यक्त केली असून, सर्व संबंधित यंत्रणांना युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी घटनास्थळी भेट देऊन मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतला.